कोकण

रत्नागिरी- ब्रिटिशांनी ओळखले होते रत्नागिरीचे महत्त्व

CD

ब्रिटिशांनी ओळखले होते रत्नागिरीचे महत्त्व

राजेंद्रप्रसाद मसुरकर ; इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळाचे उदघाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : ब्रिटिशांनी रत्नागिरीचे महत्व ओळखले आणि सागरी सीमा सुरक्षित केली. त्यासाठी ब्रिटिशांनी शासकीय इमारती बांधल्या. रत्नागिरीने भारताला विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती दिल्या, असे प्रतिपादन पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केले.
रत्नागिरीत सामाजिक चळवळी, राजकीय घडामोडी, स्त्री शिक्षण अशा विविध पैलुंवर प्रकाश टाकला. या वेळी मसुरकर यांनी आधुनिक महाराष्ट्रातील रत्नागिरी या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, रत्नागिरी शहराचा इतिहास व्यापक आहे. सुरवाताली इंग्रजांनी जिल्हाधिकारी कार्यालय (कलेक्टरेट) स्थापन केले. त्या काळी मंडणगड, कुडाळ व लांजा तालुक्यांना पेटा म्हणत असत. म्हणजे पेटा हा मराठी अपभ्रंशित शब्द आहे. पेटीकॅश (किरकोळ) महसूल किरकोळ असल्याने त्यांना पेटा म्हणत. स्वातंत्र्यानंतर तालुका दर्जा मिळाला. इंग्रजांनी नगरपालिकेची म्युन्सिपल बरो म्हणून स्थापना केली. बरो म्हणजे शहर प्रशासनाचे मुख्य केंद्र. स्वातंत्र्यानंतर नगरपालिका, जिल्हा लोकल बोर्ड, जिल्हा परिषद स्थापना झाली. रत्नागिरी जिल्ह्याचे १९८० साली विभाजन झाले. यातील मतदारसंघांची पुनर्रचना तीन वेळा झाली.
श्री. मसुरकर यांनी त्यांच्या भाषणात कर्तबगार व्यक्तींची माहिती दिली. यात धर्मशास्त्राचा इतिहास लिहिणारे महामहोपाध्याय पां. वा. काणे, स्त्री शिक्षणाचे संस्थेचे रुपांतर करणारे महर्षी कर्वे, उपनिषदांचे मराठी भाषांत व छत्रपती शिवरायांचे गद्य चरित्र लिहिणारे वेंगुर्ल्याचे कृष्णराव केळुसकर यांची माहिती दिली. लोकहितकर्ते बाबासाहेब बोले यांनी मुंबईच्या विधीमंडळात अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यांवर मुक्त प्रवेश मिळावा, असा ठराव पास करून घेतला होता. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाडमधील चवदार तळ्याचा लढा वैध ठरला. भागोजीशेठ कीर, चरित्रकार धनंजय कीर, वि. द. भिसे, अप्पासाहेब पटवर्धन यांचीही माहिती दिली.
या वेळी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. चिंतामणी दामले, पर्यवेक्षक प्रा. सुनिल गोसावी, विभाग प्रमुख प्रा. वैभव कानिटकर, प्रा. शिल्पा तारगांवकर, मंडळाचे समन्वयक निनाद तेंडुलकर उपस्थित होते. डॉ. कुलकर्णी यांनी इतिहास विभाग नवीन पिढीला भारताचा वैभवशाली इतिहास ज्ञात करुन देत आहे. हे काम असेच उत्साहाने करत राहील, अशी इच्छा व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motivation Story : 'संकटातही सोडत नाहीत पत्‍नीचा हात'; रहीम भाई व अनसना यांचा संघर्षमय प्रवास

Yogi Adityanath : माफिया मुख्तार अंसारीच्या जागेवर गरिबांचे हक्काचे घर! मुख्यमंत्री योगींनी ७२ कुटुंबांना सोपवली चावी

Dev Diwali 2025: आयुष्यात फक्त आनंदच आनंद असो... देव दिवाळीनिमित्त तुमच्या मित्रपरिवाराला द्या खास शुभेच्छा!

Happy Birthday Virat Kohli : बर्थ डे आहे, भावाचा...! विराट कोहलीचे हे तीन रेकॉर्ड त्याला भारताचा सर्वोत्तम कर्णधार बनवतात...

Pushkar Singh Dhami : ‘नीती आयोगा’त अव्वल, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत देशात पहिला क्रमांक; उत्तराखंडला ‘विकासाचे मॉडेल राज्य’ बनवण्याचा धामींचा संकल्प”

SCROLL FOR NEXT