कोकण

टेरवचा चौकशी अहवाल सीईओंकडे

CD

२२ (पान २ साठीमेन)


- ratchl२१.jpg ः
P२३M२७५५०
चिपळूण ः १७ दिवसांपासून टेरव ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर सुरू ठेवलेले साखळी उपोषण.
----------

टेरवचा चौकशी अहवाल सीईओंकडे

उपोषणाचा आज १७ वा दिवस ; आता कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष

चिपळूण, ता. २ ः टेरव ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर स्वातंत्र्यदिनी सुरू केलेले साखळी उपोषण १७व्या दिवशीही कायम राहिले आहे. निर्णय झाल्याशिवाय माघार न घेण्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीबाबत तक्रारींचा चौकशी अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेस दिला आहे. त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे उपोषणकर्त्यांचे लक्ष आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे दोन्ही ठिकाणी तक्रार केल्याने उपोषणकर्त्यांचा गणेशोत्सव पंचायत समितीसमोरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टेरव ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकासकामांत आणि साहित्य खरेदीबाबत ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे तक्रार केली होती. त्यानुसार झालेल्या चौकशीत विविध विकासकामे आणि साहित्य खरेदीबाबत अनियमितता झाल्याचे चौकशी अहवालात उघड झाले होते. विविध विकासकामे करताना तसेच साहित्य खरेदीत तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याने शासकीय नियमांना बगल दिली. विकासकामे करताना संबंधित ठेकेदाराकडून निविदा फी, अनामत रक्कम घेतली नाही. लाखो रुपयांचे साहित्य खरेदी करताना ई-निविदा प्रक्रियेची अंमलबजावणी न करताच खरेदी झाली. साहित्य खरेदी केले; पण ग्रामस्थांना त्याचे वाटप केल्याची यादी उपलब्ध होत नसल्याचा मुद्दाही उपोषणकर्त्यांनी मांडला. त्यावर पंचायत समितीने तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दोन नोटिसा दिल्यानंतर खुलासा सादर करण्यात आला. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी आपला अहवाल जिल्हा परिषदेकडे दिला आहे. उपोषणकर्त्यांनी पंचायत समितीसह जिल्हा परिषदेकडेही तक्रारी केली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे.
जलजीवनमधील पाणीपुरवठा योजनेची चौकशी झाली. मुल्यांकनात ५७५ मीटर खोदाई झाल्याचे दाखवले तरी प्रत्यक्षात ६० मीटर झाल्याचे उपोषणकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. पाणीयोजनेच्या चौकशीचा अहवालही लवकरच जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येणार आहे. या साऱ्या प्रक्रियेस काहींसा वेळ जाणार आहे.

कारवाई झाल्याशिवाय माघार नाही...
उपोषणकर्त्यांनी कारवाई झाल्याशिवाय माघार न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. राजकीय पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी उपोषण सुरूच राहिले आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांचा गणेशोत्सव पंचायत समिती समोरच होण्याची शक्यता आहे. उपोषणकर्त्यांनी तशी तयारीदेखील ठेवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: पाचोर्‍यातील कृष्णापुरीतील उपद्रवी माकडाला पकडण्यात यश

SCROLL FOR NEXT