National Lok Adalat sakal
कोकण

National Lok Adalat : राष्ट्रीय लोक अदालतीत ९५४ प्रकरणे निकाली

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशांप्रमाणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ९ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते.

सकाळ वृत्तसेवा

ओरोस - राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशांप्रमाणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ९ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते. यात जिल्ह्यातून २८८ प्रलंबित व ६६६ वादपूर्व अशी एकूण ९५४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. एकूण रक्कम रुपये ३ कोटी ७८ लाख ९४ हजार ८९० ची वसूली, तडजोड झाली असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली.

यावेळी जिल्हा न्यायालय सिंधुदुर्गनगरी येथे राष्ट्रीय लोकअदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका, जिल्हा न्यायाधीश १ व अतिरीक्त सत्र न्यायाधीश एस. एस. जोशी, जिल्हा न्यायालय २ व अतिरीक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. बी. कुरणे, दिवाणी न्यायाधीश (व-स्तर) एस. के. कारंडे तसेच विधीज्ञ ए. ए. शेख, विधीज्ञ वाय. आर. खानोलकर हे उपस्थित होते. पक्षकारांनी मोठ्या संख्येने राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सहभाग घेतला.

जिल्हा न्यायाधीश १ एस. एस. जोशी यांच्या पॅनेलतर्फे जिल्हा न्यायालयात मोठया प्रमाणात प्रकरणे निकाली झाली व उच्चांकी रकमेची तडजोड झाली. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हयातील विधीज्ञांनी उत्साहाने सहभाग घेतला.

राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी व न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच सर्व तालुका विधी सेवा समितीचे अधिकारी व कर्मचारी, अन्य शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT