सकाळ इम्पॅक्ट लोगो
--
36919
वैभववाडी ः पोलिस ठाण्यात रिक्षा व्यावसायिकांच्या बैठकीत चर्चा करताना पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे.
अवास्तव भाडे आकारल्यास कारवाई
पोलिस निरीक्षक ः वैभववाडीत रिक्षा व्यावसायिकांना इशारा
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १० ः रिक्षा व्यावसायिकांनी प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दरानुसारच भाडे आकारणी करावी. अवास्तव भाडे आकारल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी येथे रिक्षा चालकांना दिला.
मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या कालावधीत वैभववाडी रेल्वेस्थानकात अडकलेल्या रेल्वे प्रवाशांकडून काही रिक्षाचालकांनी अवास्तव भाडे आकारले होते. प्रवाशांची अक्षरक्षः लूट केली होती. यासंदर्भात ५ ऑक्टोबरला दैनिक ‘सकाळ’मध्ये ‘अडकून पडलेल्या रेल्वे प्रवाशांची लुट’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर काही रिक्षाचालकांनी केलेल्या लुटीचे प्रकार उजेडात आले होते. त्यानंतर रिक्षा संघटनेने देखील अवास्तव भाडे आकारणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घेतली. त्यांनी येथील पोलिस ठाण्यात आज तीन आणि सहा आसनी रिक्षा व्यवसायाकांची बैठक आयोजित केली होती. याला तीन आसनी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजा सरवणकर, सहा आसनी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रमेश नारकर, रेल्वे स्थानक येथील रिक्षा व्यावसायिक प्रकाश बोडेकर, बाबा तावडे, सदानंद माईणकर आदी रिक्षा व्यावसायीक उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक मेंगडे यांनी प्रवाशांकडून अवास्तव भाडे घेण्याचे प्रकार ऐकायला येत आहेत. हे बेकायदेशीर आहे. सर्व रिक्षाचालकांनी प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दरानुसारच भाडे आकारणी करावी. कुणाकडूनही अतिरिक्त भाडे घेऊ नये. रात्री अपरात्री अडचणीत सापडलेल्या प्रवाशांकडून अधिकचे भाडे घेऊ नये. यापुढे जर असे प्रकार आढळले तर कडक कारवाई करू. कुणाचीही गय केली जाणार नाही. वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावेत. रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बैठक घ्या. अवास्तव भाडे कोण घेतो, यावर देखील चर्चा करा. रेल्वे स्थानकातील वादाबाबत देखील एकत्रित चर्चा करा, अशा सूचना केल्या. यावेळी वैभववाडीतील रिक्षा व्यावसायीकांनी अवास्तव भाडे घेणाऱ्यांविरोधात कारवाई झालीच पाहिजे असे स्पष्ट केले.
-----------
चौकट
आरटीओ अधिकारी वैभववाडीत दाखल
‘सकाळ’मधून अवास्तव भाडे आकारल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर गेले दोन-तीन दिवस प्रादेशिक परिवहनच्या अधिकाऱ्यांच्या फेऱ्या देखील वैभववाडीत वाढल्या आहेत. आज शहरातील रिक्षांची त्यांनी पाहणी केली. याशिवाय काहींवर कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.