कोकण

चिपळूणातील हंगामी व्यापाऱ्यांवर कारवाई करा

CD

ratchl136.jpg-
M37789
चिपळूणः प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना महिला.
---------
हंगामी व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी
चिपळूण, ता. १३ः येथील बाजारपेठेमध्ये हंगामी व्यापार करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाहतुकीला अडथळा करून हे फेरीवाले रस्त्यावर व्यापार करतात. या फेरीवाल्यांसह हंगामी व्यापार करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा, अशी मागणी महिला व्यापाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
शहरातील व्यापारी बांधव कर भरून व्यवसाय करतात. मात्र हंगामी फेरीवाले विक्रेते शासनाला कोणताही कर देत नाहीत. रस्त्याच्या कडेलाच वस्तू माडून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. त्यावर पालिकेचा अंकूश नाही. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी महिला व्यापाऱ्यांनी केली आहे. व्यापारी महिला मंडळाच्या वतीने स्वाती भोजने, लता भोजने, स्वाती देवळेकर, निर्मला जाधव, तृप्ती कदम अशा अनेक महिलांनी शुक्रवारी पालिकेवर धडक दिली. प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबरकर यांना निवेदन देण्यात आले. येत्या काही दिवसात ही कारवाई न झाल्यास मोठ्या संख्येने महिला आणि व्यापारी मोर्चा काढणार असा इशारा महिलांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: नवल पगार गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT