फोटो ओळी-rat7p5.jpg 3M49717- रत्नागिरी : क्षत्रिय मराठा मंडळ व मराठा सप्तपदी वधू-वर सूचक केंद्रातर्फे आयोजित मेळाव्यात बोलताना संतोष तावडे. ----
क्षत्रिय मराठा मंडळ, मराठा सप्तपदीतर्फे
वधू-वर सूचक मेळाव्याला प्रतिसाद
रत्नागिरी, ता. ७ : क्षत्रिय मराठा मंडळ, मराठा सप्तपदी, वधू-वर सूचक केंद्रातर्फे मराठा समाजातील वधु-वर यांच्यासाठी वधु-वर मेळावा हॉटेल विवा एक्झिक्युटीव्ह (व्यंकटेश) येथे झाला. या वधु-वर मेळाव्याला मराठा समाजातील उपवर वधु-वर व पालक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष संतोष तावडे, सरचिटणीस योगेश साळवी, आशाताई साळवी, सौ. शुभांगी इंदुलकर आदी उपस्थित होते. या वेळी वधु-वरांच्या पालकांनी आपली मानसिकता बदलून आपल्या मुला-मुलींसाठी केवळ नोकरी करणारा वर किंवा वधू न शोधता छोट-मोठे उद्योग करणारे वधू-वर अवश्य पाहावेत आणि एकत्र कुटुंबपध्दतीत जास्तीत जास्त विवाह जुळावेत असे मत श्री. तावडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी साधारण २०० वधू-वर आणि त्यांचे पालक उपस्थित होते. मेळाव्यात प्रत्यक्ष वधू-वर यांनी आपला परिचय उपस्थित सर्वांना करून दिला. जे वधू-वर उपस्थित नव्हते, त्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याचा परिचय, अपेक्षा सांगितल्या. या वेळी छोटे-मोठे उद्योग करणारे वधू-वर तसेच प्राधान्याने एकत्र कुटुंब हवे, अशी अपेक्षा करणार्या वधू हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले. अतिशय खेळी मेळीच्या वातावरणात मेळावा झाला. दुपारी सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था मंडळामार्फत करण्यात आली. लवकरच क्षत्रिय मराठा मंडळाची विवाह नोंदणी वेबसाईट सुरू केली जाणार आहे. उपस्थित पालकांनी मंडळाचा मेळावा अतिशय उत्कृष्ट नियोजनबद्ध झाल्याचे प्रतिक्रिया दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.