कोकण

आरोग्य शिबिरास भेकुर्लीत प्रतिसाद

CD

आरोग्य शिबिरास
भेकुर्लीत प्रतिसाद
दोडामार्ग ः कोकण कला व शिक्षण विकास संस्था व ग्रामपंचायत केर-भेकुर्ली यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ० ते ६ वयोगटातील ६ बालके व सर्व ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा परिसरातील रुग्णांनी लाभ घेतला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच रुक्मिणी नाईक, उपसरपंच तेजस देसाई, ग्रामसेवक संदीप पाटील, संस्थेचे ट्रस्टी देवानंद कुबल, समन्वयक समीर शिर्के, प्रकल्प समन्वयक हनुमंत गवस, समन्वयक बाळकृष्ण शेळके, भावना साटम, एसएसपीएमचे डॉ. अजय वर्मा, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रियांका सावंत, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. संजय जोशी, वन्यजीव अभ्यासक गिरीश पंजाबी, संतोष मोर्ये आदी उपस्थित होते. शिबिरात मुले, पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, रक्तगट तपासणी करून औषध वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक समीर शिर्के यांनी, प्रास्ताविक हनुमंत गवस यांनी केले. आभार बाळकृष्ण शेळके यांनी मानले.
-----------------
नाभिक समाजाच्या
महामंडळास मान्यता
मसुरे ः नाभिक समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. महामंडळासाठी स्थापन करण्यात येणार्‍या उपकंपनीचे कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळाकडून चालविण्यात येईल. या उपकंपनीमार्फत २० टक्के बीज भांडवल योजना, एक लाखांपर्यंत थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, १० ते ५० लाख अशी गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना राबविण्यात येणार आहे. या महामंडळास ५० कोटी रुपयांचे भाग भांडवल मंजूर करण्यात आले असून, दरवर्षी पाच कोटी रुपये विविध योजना राबवण्यासाठी देण्यात येतील. उपकंपनीसाठी बारा पदांना देखील मान्यता देण्यात आली आहे.
.......................
भारत संकल्प यात्रा
वेंगुर्लेमध्ये शांततेत
वेंगुले ः वेंगुर्ले नगरपरिषद येथे विकसित भारत संकल्प यात्रा अभियान शनिवारी (ता. ३०) शांततेत पार पडले. पोलिस निरीक्षक अतुल जाधव व त्यांच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरात शांततेत पार पडलेला कार्यक्रम पाहता पुन्हा एकदा वेंगुर्ले शहर शांतताप्रिय असल्याची चर्चा नाक्यानाक्यावर दिसून आली. या यात्रेदरम्यान काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्यात आली. संपूर्ण शहरात पेट्रोलिंग करण्यात येत होते. हा कार्यक्रम नगरपरिषद व पोलिसांच्या योग्य नियोजनात पार पडला. त्यामुळे बाजारपेठेसह संपूर्ण शहरात शांतताप्रिय वेंगुर्ले शहराबाबत समाधानाचे वातावरण होते. या कार्यक्रमास नागरिकांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag KYC Process : 'फास्टॅग' अपडेट करणं आता झालं अधिकच सोपं; जाणून घ्या कसं?

IND vs AUS 2nd T20I Live: ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; अभिषेक शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताच्या अन्य फलंदाजांनी खाल्ली माती

Latest Marathi News Live Update : बोईसर एमआयडीसीत पुन्हा आग; रिस्पॉन्सिव्ह कंपनी जळून खाक, कामगारांमध्ये भीती

Telangana Revanth Reddy Cabinet: तेलंगणाच्या रेवंत रेड्डी सरकारचा मोठा निर्णय! भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधारास केलं मंत्री

IND vs AUS 2nd T20I Live: 4,6,4,0,6,W! मिचेल मार्शकडून कुलदीपचे खतरनाक स्वागत; तिलक वर्माच्या अफलातून झेलने ऑसी गार Video Viral

SCROLL FOR NEXT