

Australia defeated India in the 2nd T20I at Melbourne
esakal
India vs Australia 2nd T20I Marathi Cricket Update: ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता आणि त्या सामन्यात भारतीय फलंदाजांची उल्लेखनीय खेळी पाहायला मिळाली होती. तसाच खेळ मेलबर्नवर पाहण्यासाठी प्रेक्षक जमले होते, परंतु त्यांच्या वाट्याला निराशा आली. अभिषेक शर्मा ( Abhishek Sharma) आणि हर्षित राणा वगळल्यास अन्य फलंदाज ढेपाळले. ऑस्ट्रेलियाने हा सामना सहज जिंकला.