कोकण

जहाजं पाहण्याचा घेतला मुलांनी आनंद

CD

४४ (पान ५ साठी, अँकर)


rat५p३२.jpg-
२४M५६०४३
रत्नागिरी- येथील भगवीती बंदरात तटरक्षक दलाची जहाजे पाहण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. त्या निमित्ताने झालेली गर्दी.
rat५p३३.jpg-
२४M५६०४४
जहाजाच्या कॅप्टनची केबिनची माहिती घेताना विद्यार्थी.
-----------------

मुलांनी घेतला जहाजं पाहण्याचा आनंद

तटरक्षक दल वर्धापनदिन ; विविध शाळेतील १६० विद्यार्थ्यांना मिळाली संधी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : रत्नागिरी येथे तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त आज विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी तटरक्षक दलाच्या जहाजांना भेट देऊन तेथील परिस्थितीचा अनोखा अनुभव घेतला. वेगवेगळ्या ठिकाणाच्या एकुण १६० विद्यार्थी व शिक्षकांनी तटरक्षक दलाची गस्ती जहाजे पाहण्याचा मनमोकळेपणाने आनंद घेत अनुभव गाठीशी बांधला.
तटरक्षक दिनानिमित्ताने तटरक्षक दलाचे सी – ४५२ व सी – ४०६ ही गस्ती जहाजे रत्नागिरी शहरानजीक भगवती बंदर येथे शालेय विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुली केली होती. यावेळी शहरातील आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेचे ४७ दिव्यांग विद्यार्थी, कोकण नगर येथील इकरा इंग्लिश स्कूलचे ३५ विद्यार्थी आणि सांगली जिल्ह्यातील शेगाव येथील शैक्षणिक सहलीसाठी आलेल्या मॉडर्न इंग्लिश स्कूलचे ८८ विद्यार्थी, अशा एकूण १६० विद्यार्थ्यां व शिक्षक यांनी जहाजात जाऊन तेथील परिस्थितीचा अनुभव व आनंद घेतला.
या शाळांतर्फे प्रत्येकी कार्यशाळा प्रमुख सचिन वायंगणकर, अरुण जाधव व विजयकुमार धोंडीराम बोराडे हे प्रमुख शिक्षक-कर्मचारीवृंद उपस्थित होते. जहाजांवर तटरक्षक दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना जहाजाबद्दल व तटरक्षक दलाच्या कार्याबद्दल अवगत करून दिले. विद्यार्थ्यांना जहाजांच्या विविध भागात घेऊन जाऊन तेथील उपकरणे, त्यांची कार्यपद्धती आणि उपयोग याची माहिती दिली. समुद्रातील सैन्य जीवनावर विविध कुतूहलपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तटरक्षक दलाच्या जवानांशी संवाद साधला.
सी – ४५२ व सी– ४०६ हे गस्ती जहाजांचे कमांडिंग अधिकारी सहायक समादेशक निखिल त्रिपाठी आणि सहायक समादेशक रोहित शर्मा यांनी तटरक्षक दलाचे स्टेशन कमांडर उपमहानिरीक्षक शत्रूजीत सिंह यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘टीईटी’चा निकाल १५ जानेवारीपूर्वी! उत्तरसूचीवरील आक्षेपासाठी २८ डिसेंबरपर्यंत मुदत; प्रत्येक उत्तरपत्रिकेची होणार फेरपडताळणी, पुढच्या वर्षी दोनदा ‘टीईटी’

सोलापूर शहरातून 2 वर्षांत 155 जण तडीपार अन्‌ 50 गुन्हेगारांची येरवडा कारागृहात रवानगी; पोलिस आयुक्तांची रेकॉर्ड ब्रेक कारवाई; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

आजचे राशिभविष्य - 24 डिसेंबर 2025

Winter Special Recipe: नेहमीच्या नाश्त्याला कंटाळलात? फक्त 15 मिनिटांत बनवा ‘हे’ क्रिस्पी कांदा ब्रेड पकोडे, घरच्यांकडून मिळेल कौतुक

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT