कोकण

शिवतर मार्गावर ट्रकने घेतला पेट

CD

56328
खेड ः शिवतर मार्गावरील मुरडे नजीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला मालवाहू ट्रक.

लाकडे वाहून नेणाऱ्या
ट्रकने घेतला पेट

शिवतर मार्गावरील घटना; वाहन जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ६ : खेड-शिवतर मार्गावरील मुरडे खेडेकरवाडी नजीक जळाऊ लाकडे वाहून नेणाऱ्या एका मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतला. आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
शिवतरहून खेड दिशेने जळाऊ लाकडे वाहून घेऊन हा ट्रक (एमएच १७, क्यूजे ३७५१) निघाला होता. मुरडे खेडेकरवाडी नजीक येताच ट्रकने अचानक पेट घेतला. रस्त्यावर अचानकच ट्रक पेटल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांची एकच धावपळ उडाली. ग्रामस्थांनी तत्काळ खेड नगरपरिषदेचा बंब मागवला. त्यानंतर ही आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी हानी झालेली नाही. परंतु ट्रक जळून खाक झाला.
आंबये, जामगे, शिवतर, चिंचाळी, सातेरी जामगे या भागातील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असते. या परिसरातून नेहमीच जळाऊ लाकडांची वाहतूक मुंबई- पूणे- कोल्हापूर या सारख्या मोठ्या शहरांतून होते. आज देखील अशीच वाहतूक सुरू असताना खेड-शिवतर मार्गावर ही घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT