68621
कुडाळ ः येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलतर्फे मराठी भाषा गौरव दिनी ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी शुभांगी लोकरे, उमेश गाळवणकर, अमृता गाळवणकर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. (छायाचित्र ः अजय सावंत)
नाथ पै स्कूलतर्फे मराठी साहित्य दिंडी
मराठी भाषा गौरव दिन ः शिक्षक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बॅ. नाथ पै (सीबीएसई बोर्ड) सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांतर्फे मराठी भाषा गौरव दिंडीचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये मराठी भाषा संवर्धनसंदर्भात विविध घोषणा देत मातृभाषा ग्रंथ, ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा पालखीमध्ये ठेवून सवाद्य साहित्य दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये चेअरमन उमेश गाळवणकर, ‘सीईओ’ अमृता गाळवणकर, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘‘मातृभाषा हे समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. माणसाच्या प्रगतीच्या पाऊलखुणा त्यांच्या मातृभाषेमध्ये उमटत असतात. मराठी ही महाराष्ट्राची एक समाजभाषा आहे. तिचे अस्तित्व हे समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे.’’ या कार्यक्रमाचा प्रारंभ कवी-साहित्यिक कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने उपप्राचार्य विभा वझे यांनीही मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कुसुमाग्रजांची प्रसिद्ध कविता ‘कणा’चे वाचन शाळेच्या शिक्षिका अश्विनी परब यांनी केले. मराठी शिक्षिका वैभवी नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. वैभवी नाईक यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.