कोकण

गावखडी, मालगुंड किनारी नवीन हॅचरी

CD

rat2p18.jpg
68692
रत्नागिरी - भाट्ये समुद्र किनारी सापडलेल्या कासवांच्या घरट्याला हॅचरीद्वारे संरक्षित करण्यात आले.
--------------

गावखडी, मालगुंड किनारी नवीन हॅचरी
समुद्री कासव संवर्धन ; २५० कासवांच्या अंड्यांचे संरक्षण
रत्नागिरी, ता. ३ : तालुक्यातील गावखडी, मालगुंड आणि भाट्ये समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात समुद्र कासवांची घरटी आढळुन आली आहेत. त्याच्या संरक्षणासाठी वन विभाग, कांदळवन कक्ष आणि कासवमित्र करत असून घरट्यांसाठी हॅचरी बांधली आहे. भाट्येत सापडलेली १४९ अंडी संरक्षणासाठी गावखडी येथील हॅचरीमध्ये नेऊन ठेवली आहेत.
रत्नागिरी वन विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर समुद्री कासवांचे संवर्धनाचे काम मौजे गावखडी व मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर केले आहे. कासवांची अंडी हॅचरीमध्ये संवर्धन करुन त्यामधून निघणारी पिल्ले समुद्रात सोडण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. गेल्या महिन्यात १० तारखेला वरवडे रिळ येथे कासव घरटे मिळाल्याची माहिती मिळाली. त्याची खात्री केली असता ४ घरटी आढळून आली. या घरट्यांचे जाळी मारुन संवर्धन करण्यात आले आहे. तसेच २३ फेब्रुवारीला भाट्ये समुद्र किनारी कासवाचे घरटे आढळुन आले. या घरट्यातील १४९ कासवाची अंडी संरक्षणासाठी गावखडी येथील हॅचरीमध्ये नेऊन सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. २१ फेब्रुवारीला पुन्हा एक भाटे कासव घरटे आढळूण आले. गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व इतर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन भाटे समुद्रकिनारी नव्याने हॅचरीची निर्मिती करुन १०८ अंडी सुरक्षित आणि संवर्धित केली आहे. या ठिकाणी कासव मित्र म्हणून समीर भाटकर यांची नेमणूक केलेली आहे.
विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक बोराटे, निलेश बापट, परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार तसेच वनक्षेत्रपाल कांदळवन कक्ष रत्नागिरी किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाली वनपाल एन एस गावडे, मिताली कुबल, साबणे, कासामित्र प्रदीप हिंगणकर, राकेश पाटी, ऋषीराज जोशी, समीर भाटकर हे करत आहेत. यापुढे कुठल्याही समुदीकिनारी कासवांची घरटे आढळून आल्यास १९२८ या शासकीय टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कच्चे तेल स्वस्त! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; पाहा ताजा भाव

US Iran War : इराण युद्धामुळे अमेरिका त्रस्त, जनरलचा लढाईस नकार; जनतेनेही साथ सोडली, ट्रम्प प्रशासनासमोर मोठा पेच

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फुटी रोखण्यासाठी मोदी सरकार आज संसदेत मांडणार नवीन कठोर कायदा

Jaygad Chiplun Satara Highway : मुंबई-गोव्यानंतर आता 'हा' तिसरा महामार्ग बदलणार कोकणाचे रूप; चिपळूण बनणार लॉजिस्टिक हब, पाहा कसा असेल मार्ग

Akola Crime: वृद्ध महिलेची सोन्याची पोत हिसकावणारा आरोपी जेरबंद

SCROLL FOR NEXT