कोकण

बंद पथदीपांमुळे चालकांची गैरसोय

CD

बंद पथदीपांमुळे
चालकांची गैरसोय
नांदगाव ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या खारेपाटण ते कलमठ टप्प्यातील बसस्थानकांवरील पथदिवे व उड्डाण पुलावरील काही पथदिवे बंद आहेत. परिणामी वाहनचालक व पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधी व महामार्ग प्राधिकरण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. महामार्ग चौपदरीकरणानंतर या महामार्गाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदार कंपनीकडे आहे; मात्र ठेकेदार कंपनी बंद पथदीपांकडे दुर्लक्ष करत आहे. जिल्ह्यात सध्या गावोगावी हरिनाम सप्ताह, वार्षिक जत्रोत्सव, आंगणेवाडी यात्रा आदी उत्सव सुरू आहेत. कुणकेश्वर जत्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे महामार्गावर मुंबईकर चाकरमानी व भाविकांच्या गाड्यांची वर्दळ वाढली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पर्यटकही येण्यास सुरुवात झाली आहेत. खारेपाटण ते कलमठ टप्प्यातील बंद पथदीप सुरू करावेत, अशी मागणी वाहनचालक, प्रवासी व पादचाऱ्यांमधून होत आहे.
................
वेंगुर्लेत पथनाट्यातून
मतदानाबाबत जागृती
वेंगुर्ले ः मतदान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. मतदान करणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आणि जबाबदारी आहे. त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी योगदान देण्यासाठी एक शक्तिशाली साधन प्रदान करते. या नागरी कर्तव्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी वेंगुर्ले नगरपरिषद व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ओरोसच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले शहरात मार्केट परिसर व दाभोली नाका येथे मतदान जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले. महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पथनाट्याद्वारे नवीन मतदार नोंदणी प्रक्रिया, नागरिक मतदान हक्क, मतदान केल्याने समाजातील सकारात्मक बदल आणि परिवर्तन, मतदानाची गरज तसेच मशिन व याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Godavari River Flood Nashik : बाणगंगा नदीला महापूर, जानोरीचा पूल पाण्याखाली! नाशिक एअरपोर्ट रस्त्यावरील संपर्क तुटला; नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले

8th Pay Commission Update : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! वेतनवाढ किती होणार ? ८ व्या वेतन आयोगाच्या कामाला वेग, ५ अपडेट्स समोर

Latest Marathi News Live Update : लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडलं; सभागृहात विरोधकांचा गोंधळ अद्याप सुरुच

India Test Squad for Sri Lanka: रवींद्र जडेजा पुनरागमनासाठी सज्ज; पण, ५ खेळाडूंच्या दुखापतींनी वाढवली चिंता, महत्त्वाचे अपडेट्स

Mumbai Crime: वृद्धाला आठ कोटींना लुबाडले, दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटक; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT