कोकण

महिला, मुलींसाठी सहा ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी

CD

पान ४

महिला, मुलींसाठी
मोफत आरोग्य तपासणी
रत्नागिरी, ता. ३ ः जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी पाली येथील डी. जे. सामंत महाविद्यालय, रत्नागिरी एमआयडीसीमधील नवनिर्माण शिक्षण संस्था, कसोप- फणसोप येथील श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे, प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा आणि संगमेश्वर तालुक्यातील नवनिर्माण शिक्षण संस्था नावडी या सहा ठिकाणी महिला व मुलींसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात येत आहे. या आरोग्य शिबिराचा मुली व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
शिबिराच्या नियोजनबाबत पालकमंत्री सामंत यांनी घेतलेल्या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते. शिबिरामध्ये इसीजी, सर्व रक्त तपासण्या, अस्थिरोगतज्‍ज्ञ, तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, स्त्रीरोगतज्‍ज्ञ तपासणी, नेत्र तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया तसेच मोफत चष्मे देण्यात येणार आहे. प्री कॅन्सर डिटेक्शन युनिट रत्नागिरीत पहिल्यांदाच आणले जात आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री सामंत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Godavari River Flood Nashik : बाणगंगा नदीला महापूर, जानोरीचा पूल पाण्याखाली! नाशिक एअरपोर्ट रस्त्यावरील संपर्क तुटला; नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले

8th Pay Commission Update : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! वेतनवाढ किती होणार ? ८ व्या वेतन आयोगाच्या कामाला वेग, ५ अपडेट्स समोर

Latest Marathi News Live Update : लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडलं; सभागृहात विरोधकांचा गोंधळ अद्याप सुरुच

India Test Squad for Sri Lanka: रवींद्र जडेजा पुनरागमनासाठी सज्ज; पण, ५ खेळाडूंच्या दुखापतींनी वाढवली चिंता, महत्त्वाचे अपडेट्स

Mumbai Crime: वृद्धाला आठ कोटींना लुबाडले, दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटक; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT