कोकण

गिलनेटने मासेमारी करणार्‍यांचे गणित कोलमडले

CD

rat3p36.jpg
68863
रत्नागिरीः कासारवेली येथील जेटीवर उभ्या असलेल्या मच्छीमारी नौका.
-------

गिलनेटने मासेमारीचे
गणित कोलमडले
वाऱ्यांचा अडथळा; मासे मिळत नसल्याने नांगर टाकला
रत्नागिरी, ता. ३ः अचानक सुटलेल्या वाऱ्यांचा तडाखा गिलनेटसह छोट्या-मोठ्या नौकांनी मासेमारी करणाऱ्यांना बसत आहे. मासे पकडण्यासाठी जाळे समुद्रात टाकल्यानंतर नौका स्थिर राहत नसल्यामुळे गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांनी बंदरावर नांगर टाकून ठेवणे पसंत केले आहे. सध्या किनारी भागात मासाच मिळत नसल्याचे छोट्या मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. बदलत्या वातावरणाबरोबरच डॉल्फिनचाही त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या पंधरवड्यात समुद्रकिनारी भागात अचानक वारे वाहण्यास सुरू होत असल्यामुळे पाण्यालाही करंट बसत आहेत. लाटा उसळत असल्यामुळे नौका पाण्यात स्थिर राहत नाहीत. वाऱ्याबरोबर नौका हलत राहतात. परिणाम जाळे टाकल्यानंतर त्यामध्ये मासे येत नाहीत. तसेच पाण्याला करंट असेल तर मासेही खोल समुद्राकडे जातात. गिलनेटने मासेमारी करणाऱ्या नौकांची संख्या पुर्णगड, मिऱ्या, काळबादेवी, जयगड, राजीवडा या परिसरात अधिक आहेत. मिऱ्या ते गणपतीपुळे परिसरात मासेच मिळत नसल्यामुळे मच्छीमारांना रित्या हाताने माघारी परतावे लागत आहे. खर्च वळता होईल एवढे पैसेही मिळत नसल्याने मच्छीमारांची पंचाईत झाली आहे.
गेले दोन दिवस सायंकाळच्या सत्रात हलके वारे वाहू लागत आहेत. रविवारी वाऱ्याचा वेग वाढला असून गारवाही आहे. वाऱ्यामुळे मच्छीमारांनी नौका बंदरातच उभ्या केल्या आहेत. कधी मासे नाहीत म्हणून तर कधी निसर्गाकडून साथ मिळत नसल्याने मच्छिमारांना बंदरातच उभे रहावे लागत आहे. त्याचबरोबर थंडीच्या कालावधीत डॉल्फिनच्या झुंडी रत्नागिरीच्या किनारी भागात अधिक वाढलेल्या आहेत. या झुंडी मासे पकडणाऱ्या जाळ्यावर आक्रमण करतात. मासे खाऊन जाळ्याचे नुकसान करतात. परिणामी मच्छीमारांना मोठा फटका बसत आहे. कासारवेली येथील मच्छी विक्रेत्यांना अन्य मोठ्या बंदरातून मासे विक्रीसाठी आणावे लागत असल्याचे मच्छिमारांनी सांगितले.
दरम्यान, मोठ्या बोटींनाही अपेक्षित मासा हाती लागत नसल्याचे सुरमई, पापलेट यासारख्या माशांचे दर दुप्पट झाले आहे. हे मासे ६०० ते ८०० रुपये किलोंनी विकले जात आहेत. म्हाकुळ, बळा यारख्या माशांच्याही किंमती वधारलेल्या आहेत.

कोट
गेले काही दिवस गिलनेटने मासेमारी बंद आहे. जाळ्यात मासेच मिळस नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. तसेच डॉल्फिनच्या झुंडी वाढल्यामुळे मासे जाळ्यात सापडत नाहीत.
- श्रीदत्त भुते, मच्छीमार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Deepfake Row : एक्स, मेटा अन् गुगलवर होणार कारवाई? E20 पेट्रोल वादात नाव ओढल्याने मंत्री नितीन गडकरी कोर्टात; जाणून घ्या काय आहे प्रकरण

घास हिरावून घेतोय निसर्ग! आपत्तींमुळे अन्नसुरक्षा धोक्यात, राज्यात ७५ लाख हेक्टर शेतीला फटका

Latest Marathi News Live Update: बेपोरमधील नारळ तेलाच्या गिरणीला आग

आईवडील, पुतणीला समजलं तेव्हा... 'छावा'नंतर झालेल्या ट्रोलिंगवर अखेर बोलला संतोष जुवेकर; म्हणतो- लोकांना...

Dharmendra Pradhan Video: धर्मेंद्र प्रधानांचं जंगी स्वागत; राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच संसदेत आले; BJP च्या खासदारांनी पाहा काय केले...

SCROLL FOR NEXT