पान १
टेंपो-दुचाकी धडकेत
गंभीर जखमीचा मृत्यू
एक जखमी ः साळवी स्टॉपजवळ घटना
रत्नागिरी, ता. ३ ः शहरातील साळवी स्टॉप येथे शनिवारी (ता. २) टेंपो आणि दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एकाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. विनायक अनंत रहाटे (वय ५०, रा. मूळ कुडली-जांभारी, सध्या ः थिबापॅलेस, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या एकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २) रात्री सव्वाअकराच्या सुमारास साळवी स्टॉप येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विनायक रहाटे व सिद्धांत दिवाकर मेस्त्री (वय २४, रा. मेर्वी, रत्नागिरी) दोघेही कुवारबाव येथे खासगी कंपनीत कामाला आहेत. शनिवारी रात्री ड्यूटी आटोपून सिद्धांन्त मेस्त्री दुचाकी (एमएच ०८ एडब्ल्यू -८१९१) वरून विनायक रहाटे यांच्यासह रत्नागिरीकडे येत असताना साळवी स्टॉप येथील एका हॉटेलसमोर रत्नागिरीहून येणाऱ्या टेंपो (एमएच ०९ ईएम ६६०८) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी टेंपोच्या खाली गेली. दोघेही रस्त्यावर पडले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दोघांनाही तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दुचाकीच्या मागे बसलेले विनायक रहाटे यांचा रविवारी (ता. ३) सकाळी सव्वासातच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मागे तीन मुलगे व पत्नी असा परिवार आहे. याप्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी टेंपोचालक जावेद आयुष इनामदार (रा. इचलकरंजी, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.