

Hardik Pandya IPL 2027 Trade
Sakal
Hardik Pandya Trade reports Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यापासून सातत्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या ट्रेडबद्दल चर्चा होत आहेत. २०२४ आयपीएलआधी हार्दिक पांड्याला मुंबईने हार्दिकला गुजरात टायटन्सकडून ट्रेडमधून घेतल्यापासूनच त्याचे मुंबईतील पुनरागमन चर्चेत होते.
त्याला मुंबईने संघात पुन्हा घेतल्यानंतर रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवली. पण २०२४ मध्ये हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई शेवटच्या क्रमांकावर राहिले, २०२५ मध्ये मुंबईने प्लेऑफमध्ये प्रवेश केला, पण एलिमिनेटरमध्ये ते पराभूत झाले.
यानंतर २०२६ मध्येही केवळ ४ सामने जिंकल्याने मुंबई ९ व्या क्रमांकावर राहिले होते. या हंगामात हार्दिकला कामगिरीतही फारशी कमाल करता आली नाही. त्याने आयपीएल २०२६ मध्ये १० सामन्यांत खेळताना २०६ धावा केल्या, तर ४ विकेट्स घेतल्या.