कोकण

ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानचा शिमगोत्सव

CD

rat10p34.jpg-
70351
रत्नागिरीः अरुअप्पा जोशी गुणवंत विद्यार्थी पारितोषिक गौरी कुलकर्णी हिला देताना विश्‍वस्त.
------------
श्रीदेव भैरी देवस्थानचा २४ पासून शिमगोत्सव
वार्षिक सभा; गुरव यांच्याकडे होळीचा शेंडा, ३० ला सांगता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : सालाबादप्रमाणे ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानचा शिमगोत्सव येत्या फाल्गुन पौर्णिमेपासून म्हणजे २४ मार्चपासून सुरू होणार आहे. याची रूपरेषा आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठरवण्यात आली. यंदा होळी चंद्रकांत गुरव यांच्या कंपाऊंडमधून होळीचा शेंडा घेतला जाणार आहे.
श्रीदेव भैरी मंदिरामध्ये आज सकाळी झालेल्या सभेस बारा वाड्यांतील मानकरी, गावकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते. शिमगा उत्सव आंनदाने, शांततेने व (कै.) अरुअप्पांनी घालून दिलेल्या शिस्तबद्ध पद्धतीने उत्साहाने व वेळेवर साजरा करुया, असे आवाहन कले. शिक्षणमहर्षी (कै.) एन. व्ही. तथा अरुअप्पा जोशी गुणवंत विद्यार्थी पारितोषिक रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी गौरी कुलकर्णी हिला स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम पाच हजार देऊन सन्मानित केले.
२५ ला ग्रामदैवत भैरीची पालखी टिळक आळी गणपती मंदिराजवळून श्रीदेवी जोगेश्‍वरी मंदिराजवळ चंद्रकांत गुरव यांच्या कंपाऊंडमध्ये होळीचा शेंडा घेण्यासाठी जाईल. तेथून होळीचा शेंडा घेऊन दुपारी ३ वाजेपर्यत झाडगाव येथे सहाणेवर जावून तेथे होळी उभी केली जाईल. भैरीबाबाच्या पालखीची ठरलेल्या मार्गावरून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. रत्ननगरीतील भाविकांनची ख्यालीखुशाली विचारत आशीर्वाद देणार आहे. २५ ला रात्री धुळवड साजरी करण्यात येणार आहे.

चौकट
सहाणेवर दर्शन
पालखीत विराजमान झालेल्या ग्रामदैवत श्री भैरीचे दर्सन सहाणेवर घेता येईल. २७ ते २९ मार्चला दुपारी १२ वाजेपर्यंत श्रीदेव भैरीची पालखी सहाणेवर स्थानापन्न असेल. तसेच २७ ते २९ मार्चला रात्री १० ते १२ या वेळेत प्रत्येक वाडीतर्फे पारंपरिक पद्धतीने पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल.

चौकट
रंग खेळून सांगता
फाल्गुन पंचमी म्हणजे ३० मार्चला शिमगोत्सवाची रंगपंचमीने खेळून सांगता होणार आहे. दुपारी १ वाजता श्रीदेव भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी निघेल. त्यावेळी पोलिसांची शस्त्रसलामी देण्यात येईल. शहर पोलिस ठाण्यातही पालखी प्रथेप्रमाणे नेण्यात येईल. रात्री ११.३० वाजता पालखी श्रीदेव भैरी मंदिराच्या प्रागंणात पोहोचेल व १२ वाजता पालखी श्रीदेव भैरी मंदिरात स्थानापन्न होईल. नंतर धुपारत व गावाचे गार्‍हाणे होवून शिमगा उत्सवाची सांगता होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT