कोकण

काजू बोंडू, टसरसाठी ७५ टक्के अनुदान

CD

70371
दीपक केसरकर
काजू बोंडू, टसरसाठी ७५ टक्के अनुदान

दीपक केसरकर ः सावंतवाडीत उद्या मार्गदर्शन मेळावा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः शासनाच्या ‘सिंधूरत्न’ योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काजू बोंडू प्रक्रिया आणि टसर रेशीम उद्योग यासाठी ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि तांत्रिक माहिती देण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मेळावे आयोजित केले असून, या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. या शेतकरी मेळाव्याला श्री. केसरकर आणि कृषी विद्यापीठांच्या तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काजू लागवड होत आहे. परंतु, बोंडूवरील प्रक्रियेचे उद्योग नसल्याने बोंडू फेकून दिले जातात. या बोंडूवर प्रक्रिया करून त्याद्वारे आर्थिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने काजू बोंडू प्रक्रिया उद्योगाचे मार्गदर्शन आणि यंत्रसामग्री देण्यात येणार आहे. काजू बोंडूप्रमाणे जिल्ह्यात आईन वृक्षावर टसर रेशीम निर्मिती प्रकल्पास पोषक वातावरण आहे. जिल्ह्यात टसर रेशीम उद्योग प्रकल्प चांगले यशस्वी होऊ शकतात, या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या दोन्ही उद्योगांना ७५ टक्के अनुदान सिंधूरत्न योजनेतून देण्यात येणार असून, मंगळवारी (ता.१२) दुपारी अकरा वाजता येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात इच्छुक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. काजू बोंडू प्रक्रिया उद्योगाबाबत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ शास्त्रज्ञ या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील बचतगटांना तसेच आईन उत्पादन करू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वनविभागाचे उपवनसंरक्षक, वरिष्ठ अधिकारी तसेच तज्ज्ञ रेशीम निर्मिती तज्ज्ञ योगेश फोंडे हे मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांनी मेळाव्यास येताना आधारकार्ड, काजू लागवडीचे सातबारा, किसान कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स आदी कागदपत्रांच्या सत्यप्रती सोबत आणाव्यात. काजू बोंडू प्रक्रिया उत्पादनाला कोकण कृषी विद्यापीठामार्फत बाजारपेठ मिळवून देण्यात येणार आहे. कोकण कृषी विद्यापीठ आणि जिल्हा कृषी खाते या योजनेचे सहयोगी यंत्रणा आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : बारामतीमध्ये सार्वजनिक शौचलयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट, महिला आणि दोन चिमुरडे जखमी

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

IPL 2026 : 1,52,85,09,99,296.. राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! अमेरिकेतील उद्योजकाने खरेदी केला संघ, IPL मधील सर्वात मोठी डिल

SCROLL FOR NEXT