Talkat Forest Tiger esakal
कोकण

तळकटजवळ शिंदे गटाच्या नेत्याला भरदिवसा वाघाचं झालं दर्शन; फोटो काढताच वाघानं जंगलात ठोकली धूम

तळकट-सिधाच्या डोंगराच्या पायथ्याशी आज पुन्हा एकदा वाघाचे (Tiger) अस्तित्व अधोरेखीत झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी कुंभवडे येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना तळकट-खडफडे रस्त्यावर भर दिवसा या वाघाचे दर्शन झाले.

दोडामार्ग : पर्यावरणदृष्ट्या (Environment) समृद्ध आणि मायनिंग लॉबीची वक्रदृष्टी सहन करणाऱ्‍या तळकट-सिधाच्या डोंगराच्या पायथ्याशी आज पुन्हा एकदा वाघाचे (Tiger) अस्तित्व अधोरेखीत झाले आहे. वाघाने दिवसा ढवळ्या तळकट-खडपडे रस्त्यावर दर्शन दिले. त्याची छबी छायाचित्रबद्धही झाली आहे.

तळकट पंचक्रोशीत समृद्ध जंगल (Talkat Forest) आहे; मात्र या भागात खनिज प्रकल्पांसाठी गेली अनेक वर्षे मायनिंग लॉबी प्रयत्न करत आहे. पश्‍चिम घाट अभ्यास समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांनी या भागाचा दौरा करून आपल्या अहवालात हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असून त्याच्या संवर्धनासाठी उपाय योजण्याची शिफारस केली होती; मात्र नंतर आलेल्या कस्तुरीरंगन समितीने हा अख्खा दोडामार्ग तालुकाच पर्यावरण निर्बंध अर्थात इकोसेन्सिटीव्हमधून वगळला होता.

वास्तविक, या भागात हत्ती आणि वाघ या अन्नसाखळीतील सगळ्या वरच्या स्तरातील प्राण्यांचे वास्तव्य आहे; मात्र या प्राण्यांचा अधिवास असल्यास पूर्ण अन्नसाखळी अर्थात पर्यावरण समृद्ध असल्याचे मानले जाते. असे झाल्यास खनिज प्रकल्प राबवण्यास अडथळे येऊ शकतात. यामुळे या भागातील वाघाचे अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न वारंवार प्रशासनाकडूनसुद्धा केला जातो. अगदी वनविभागही या भागात वाघ असल्याची नोंद घेण्याबाबत नाखूश असतो. या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा या भागात वाघाने दर्शन दिले आहे. हा वाघ छायाचित्रबद्धही झाल्याने ही घटना पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी कुंभवडे येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना तळकट-खडफडे रस्त्यावर भर दिवसा या वाघाचे दर्शन झाले. तालुकाप्रमुख गणेशप्रसाद यांनी त्या वाघाचे छायाचित्र आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले. सकाळी अकराच्या दरम्यान ते जंगल भागातील रस्त्यावर पोहोचले असता रस्त्याजवळून स्वैर फिरत असलेला वाघ त्यांच्या दृष्टीस पडला. लागलीच त्यांनी मोबाईलमध्ये वाघाचे छायाचित्र टिपले. या सर्वांची चाहूल लागताच वाघाने जंगलात धूम ठोकली. ही माहिती वनविभागाला कळविल्याचे त्यांनी सांगितले.

तळकट-खडपडे मार्गावर दिसलेल्या वाघाचे अस्तित्व या भागात काही दिवसांपासून आहे. दोडामार्ग तालुक्यात तिलारी धरणक्षेत्र व भेकुर्ली या भागांतही त्याचे अस्तित्व जाणवत आहे. प्रत्येक ठिकाणी वाघाचे दर्शन होत असले, तरी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा वाघ असेल, असे सांगता येत नाही. कारण एक वाघ दुसऱ्या ठिकाणीही जाऊ शकतो.

-वैशाली मंडल, वनक्षेत्रपाल, दोडामार्ग

वन विभागाच्या भूमिकेकडे लक्ष

या आधीही अनेकदा वाघाने या भागात दर्शन दिले. याची माहिती वनविभागाला देण्यात आली; मात्र त्याची नोंद घेण्यासंदर्भात फारशी हालचाल झाली नाही. आता वाघाची छायाचित्रच उपलब्ध आहे. यामुळे वनविभाग काय भूमिका घेतो, याची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT