कोकण

शिवखोलमध्ये अंमली पदार्थावर गुन्हे शाखेचा छापा

CD

८ (पान ३ साठी)

शिवखोल-रत्नागिरीत अमली पदार्थ जप्त

दोघे संशयित ताब्यात; गांजाच्या ३८ पुड्या जप्त

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : शहरातील राजिवडा-शिवखोल येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. यांच्याकडून गांजा या अमली पदार्थाच्या ३८ पुड्या, रोख रक्कम, वजनकाटा असा ६० हजाराचे मुद्देमाल जप्त केला.
सलमा नाजीम पावसकर व मुजीब दिलाल चाऊस (रा. शिवखोल) असे पकडण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. शिवखोलमध्ये गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात छापा टाकून कारवाई करण्यात आली. कारवाईत सलमा पावसकर व मुजीब चाऊस यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३४० ग्रॅम वजनाचा गांजाच्या ३८ पुड्या, वजनकाटा, रोख रक्कम इतर साहित्यासहित ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रत्नागिरी शहर हे सुसंस्कृत म्हणून ओळखले जाते. मात्र शहरात मावा, गुटखा, चरस, गांजा याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे वारंवार पुढे आले आहे. पोलिसांनी त्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली तरी पोलिसदलाला यावर अंकुश घालता आलेला नाही. अमली पदार्थांचा विळखा वाढत असून, यामध्ये विद्यार्थ्यांसह तरुण पिढी गुरफटली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT