कोकण

निवडणूक पानासाठी

CD

२६ (निवडणूक पानासाठी)

खासदार निवडीत महिलांचा वाटा मोठा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ः रत्नागिरीत महिला मतदारांची संख्या जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात पुरुषांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या निवडणुकीतही नवा खासदार निवडण्यात या महिला मतदारांचा वाटा मोठा आहे. पाचही मतदारसंघात महिला मतदारांची संख्या ५१.६१ टक्के तर पुरुष मतदार ४८.३९ टक्के आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक आहे. याचे प्रमुख कारण ग्रामीण भागातील पुरुष चाकरीसाठी मुंबईला मोठ्या संख्येने असल्यामुळे ग्रामीण भागात महिलांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार १२,९७,८२४ आहेत. यापैकी पुरुष ६,२७,९०८ आणि महिला ६,६९,९०५ आहेत. म्हणजेच सुमारे ४२ हजारांनी महिलांची संख्या अधिक आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक महिला मतदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची टक्केवारी ५१.६१ इतकी आहे. तर पुरुष मतदार ४८.३९ टक्के आहेत. जिल्ह्यातील राजकारणात माजी आमदार कुसुमताई अभ्यंकर, मामी भुवड या महिलांचा राजकारणात सक्रिय सहभाग होता. त्यानंतरच्या पिढीतील रचना महाडिक, मंदा गुरव, रश्मी कदम, मनीषा जाधव, सोनाली सावंत यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच अनेक महिला जिल्हा परिषदेच्या सदस्यही होत्या. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महिला मतदार जास्त आहेत. तरीही आतापर्यंत महिला लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधित्व केलेले नाही.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT