

Latur Nitur Shirol Accident Two 18 Year Old Friends Die in Bike Crash Forensic Team Begins Investigation Into Cause
esakal
-संगमेश्वर करंजे
निटूर : निलंगा तालुक्यातील निटूर ते शिरोळ मार्गावर कलांडी पाटीच्या पुढे लिंबराज शंकर बनसोडे यांच्या शेताजवळ झालेल्या रस्ते अपघातात शिरोळ येथील दोन १८ वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन ते रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे शिरोळ वांजरवाडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मात्र हा अपघात आहे की घातपात याबद्दल उलट सुलट चर्चा होत असून तपासासाठी लातूर येथून फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे.