Maharashtra Rain News : राज्यात पुढील चार ते पाच दिवस पाऊस पाठ फिरवेल, असा अंदाज हवामान विभागाचा होता. पण काही भागात पावसाने हजेरी लावली. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. मुंबईतील अनेक भागात पावसाला सुरूवात झाली. विजांच्या कडकडाटासह पाऊस होतोय. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा विस्कळीत झाला. कबी दाब प्रणाली निवळल्यानंतर गुजरात १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. मराठवाड्यापासून कर्नाटकपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.