कोकण

चिपळूण-मराठा समाजाचे सर्वेक्षण करणारे प्रगणक मानधनाविना

CD

पान ३

सर्वेक्षण करणारे प्रगणक मानधनाविना
प्राथमिक शिक्षक समिती ः जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चिपळूण, ता. ४ : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्यावतीने मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. यासाठी नेमणूक केलेल्या प्रगणकांनी महत्त्वाची भूमिका बजावली; मात्र या प्रगणकांना शासनाने जाहीर केलेले मानधन अद्याप प्राप्त झालेले नाही. ते मानधन संबंधितांना तातडीने द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे केली आहे.
मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम अत्यंत तातडीने पूर्ण करण्यात आला. या सर्वेक्षणासाठी शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी व अन्य शासकीय कर्मचाऱ्यांची प्रगणक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. अत्यंत मर्यादित काळात हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात कर्मचाऱ्यांनी फार मोठे योगदान दिले. सर्वेक्षणासाठी कर्मचाऱ्यांना योग्य ते मानधन दिले जाईल, अशा प्रकारचे निर्देश शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले होते; मात्र कोणत्याही प्रगणकाला आजतागायत अशा प्रकारचे मानधन प्राप्त झालेले नाही. त्यामुळेच महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य मागासवर्ग आयोगाला मानधनाबाबत निवेदन सादर दिले आहे. याचा त्वरित निर्णय व्हावा, अशी अपेक्षा संघटनेचे जिल्हा नेते प्रदीप पवार व जिल्हाध्यक्ष यशवंत पेढांबकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करताय? तर थांबा, पोलिसांची पहिली कठोर कारवाई

8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार ? आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टबाबत सरकारकडून मोठी अपडेट !

डम्पर मालकाने पगार थकवला; पैशासाठी सतत विनवणी, तरीही हाती निराशा, चालक संतापला अन्... थरारक व्हिडिओ व्हायरल

विना ID प्रूफ वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम! मोदी सरकारने तयार केला 'डिजिटल चक्रव्यूह'; जाणून घ्या नवा नियम

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

SCROLL FOR NEXT