कोकण

कोमसापचे जिल्हा संमेलन

CD

३ (टुडे १ साठी, अॅंकर)


rat४p२३.jpg-
२४M७५२३१
रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हा संमेलनाची माहिती देताना केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, विश्वस्त रमेश कीर. सोबत डावीकडून नलिनी खेर, आनंद शेलार, गजानन पाटील आदी.
----------

मराठीचा जागर करण्यासाठी ‘कोमसाप’चे जिल्हा संमेलन

विविधांगी कार्यक्रम; नायगावकर यांच्या हस्ते उद्या होणार उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा मराठी साहित्य संमेलन ६ आणि ७ एप्रिलला मालगुंडच्या कवी केशवसुत स्मारकात आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनुपमा उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होणार असून, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर व संमेलन संयोजन समितीचे प्रमुख रमेश कीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संमेलनात शनिवारी सकाळी ८.३० वा. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात येईल. १० वा. उद्घाटन कार्यक्रमाला संस्थापक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक, स्वागताध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, साहित्यिक सुरेश जोशी, मालगुंड सरपंच श्वेता खेऊर, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १२.३० पुस्तकं... सांगतात खूप काही या परिसंवादात प्रा. बाळासाहेब लबडे, जयू भाटकर, मदन हजेरी, जयश्री बर्वे संवाद साधतील. अध्यक्षस्थान साहित्यिक प्रा. सुरेश जोशी भूषवतील. दुपारी ३ वा. कविता पद्य पदन्यासमध्ये अमेय धोपटकर व सहकारी सादरीकरण करतील. सायंकाळी ४.३० वा. युवक आणि समाजमाध्यमांवरील लेख या विषयावरील परिसंवादात माधव अंकलगे, अरूण मोर्ये, राजेश गोसावी, शाहिद खेरटकर, युयुत्सू आर्ते संवाद साधतील. अध्यक्षस्थानी गोविंद राठोड आहेत. सायं. ६.३० नैऋत्येकडील वारा या कवीसंमेलनात प्रा. एल. बी. पाटील, सुधीर शेठ, प्रवीण दवणे, रूजारियो पिंटो, उषा परब, लता गुठे, आकांक्षा भुर्के व गझलकार देविदास पाटील व सहकारी सहभागी होतील. याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर भूषवणार असून, अरूण म्हात्रे संवादक आहेत. रात्री ९ वा. सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक कलाकार सादर करणार आहेत. यात कोळीनृत्य, जाखडी, मंगळागौर, नमन, समई नृत्य, पोवाडा व इतर कार्यक्रम आहेत.
७ एप्रिलला सकाळी ९ वा. बदलते कोकण परिसंवादात पर्यटन व उद्योगावर रमेश कीर, सांस्कृतिकवर नितीन जोशी, शैक्षणिकबाबत डाएटचे प्राचार्य सुशील शिवलकर, पत्रकारितेवर पत्रकार सतीश कामत संवाद साधतील. प्रमोद कोनकर याचे संवादक आहेत. संमेलनाचे समारोप ४.३० वा. होईल.
-------------
चौकट १
बालसाहित्याचाही समावेश
रविवारी सकाळी ११.१५ ते १ या वेळेत कवितेच्या गावा जावे कार्यक्रमात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, अरूण म्हात्रे, एल. बी. पाटील, अनुपमा उजगरे कविता सादर सादर करतील. बालसाहित्याच्या प्रांगणात हा दुपारी १ ते २ विशेष कार्यक्रम भारत शिक्षण मंडळाचे कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरचे विद्यार्थी कथा, कविता, नाट्यछटा, गाणी, एकांकिका असे विविधांगी सादरीकरण करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT