Mahayuti candidate Sunil Tatkare esakal
कोकण

Sunil Tatkare : 'भाजपने धर्मनिरपेक्ष विचार सोडा असं कधीच सांगितलं नाही, त्यामुळं आम्ही हे विचार कधीच सोडणार नाही'

'जे आयुष्यभर एका धर्माचा द्वेष करत आले तेच आज निवडणुकीत धर्मनिरपेक्षतेचे लांगुनचालन करत आहेत.'

सकाळ डिजिटल टीम

'अल्पसंख्यांक विभागाचा निधी वाढावा यासाठी महाविकास आघाडीमध्ये नवाब मलिक यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ते यशस्वी झाले नाहीत.'

दाभोळ : एनडीएमध्ये (NDA) सामील होताना भाजपने (BJP) धर्मनिरपेक्ष विचार सोडा, असे कधीच सांगितले नाही व आम्ही हे विचार कधीच सोडणार नाही. आपल्या राजकीय वाटचालीला पुढील महिन्यात ४० वर्षे पूर्ण होत असून आपण आजपर्यंत सर्वधर्मसमभाव याच विचारावर वाटचाल केली आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दापोलीत आयोजित अल्पसंख्याक समाजाच्या (Minority Community) मेळाव्यात सांगितले.

खासदार तटकरे म्हणाले, ‘‘जे आयुष्यभर एका धर्माचा द्वेष करत आले तेच आज निवडणुकीत धर्मनिरपेक्षतेचे लांगुनचालन करत आहेत. अल्पसंख्यांक विभागाचा निधी वाढावा यासाठी महाविकास आघाडीमध्ये नवाब मलिक यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ते यशस्वी झाले नाहीत. मात्र आम्ही एनडीएमध्ये सामील झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने या विभागाचा निधी थेट २०० कोटीवरून ८०० कोटींवर नेला.

२०१९ मध्ये मी खासदार झाल्यानंतर अल्पसंख्यांक बहुल तालुक्यासाठी असलेला निधी मोठ्या प्रमाणात मंडणगड तालुक्यासाठी आणण्यात आपल्याला यश मिळाले आहे. आखाती देशात जाणारा मुस्लिम तरुण येथेच राहावा, येथेच त्यांनी नोकरी धंदा करावा यासाठी आपण भारत सरकारच्या माध्यमातून अनेक योजना व उद्योगधंदे आणण्याचे काम करणार आहोत.’’ या वेळी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक सेलचे निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी, दापोली तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT