Devgad Crime News
Devgad Crime News esakal
कोकण

Devgad Crime : चारित्र्याच्या संशयावरून धारदार हत्याराने पत्नीचा खून; संशयित पती पोलिसांच्या ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

पत्नीने पतीला ‘’तुम्ही माझ्यावर संशय घेता, मला घटस्फोट हवा आहे,’’ असे सांगितले. त्यावेळी पतीने त्यास नकार दिला.

देवगड : चारित्र्याच्या संशयावरून पतीने धारदार हत्याराने वार करत पत्नीचा खून केला. हा प्रकार आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास तालुक्यातील महाळुंगे-धनगरवाडी परिसरात घडला. सुप्रिया सुनील पेडणेकर (वय ५०) असे तिचे नाव असून याप्रकरणी पती सुनील सदानंद पेडणेकर (५८) याला संशयित म्हणून विजयदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. उशिरापर्यत विजयदुर्ग पोलिस ठाण्यात (Vijaydurg Police) गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : पेडणेकर कुटुंब तालुक्यातील महाळुंगे-धनगरवाडी परिसरात वास्तव्याला होते. पती, पत्नी आणि मुलगा राहत होते. मुंबईत (Mumbai) व्यवसायानिमित्त असलेल्या पेडणेकर कुटुंबाने २०२२ च्या सुमारास मुंबई सोडून तालुक्यातील महाळुंगे धनगरवाडी परिसरात घर बांधले. तेथे तिघे राहत होते. ऑगस्ट २०२३ च्या सुमारास पती, पत्नी गावी काम नसल्याने पनवेल येथे भाडे तत्त्‍वावर खोली घेऊन राहण्यास गेले होते.

दरम्यानच्या काळात पती-पत्नीमध्ये वादंग होत असत. फेब्रुवारीच्या सुमारास पुन्हा महाळुंगे येथे राहण्यास पेडणेकर कुटुंब आले. त्यानंतर पत्नी मोबाईलवर बोलते यावरून पती वारंवार संशय घेत असे. सततच्या संशयाला कंटाळून पत्नीने पतीकडे घटस्फोट (Divorce) मागितला. त्या रागाने त्यांच्यामध्ये भांडणे होत होती.

काल सकाळी साडेनऊच्या सुमारास पती-पत्नीमध्ये पुन्हा वादंग झाला. पत्नीने पतीला ‘’तुम्ही माझ्यावर संशय घेता, मला घटस्फोट हवा आहे,’’ असे सांगितले. त्यावेळी पतीने त्यास नकार दिला. त्यावेळी दोघांमध्ये भांडण सुरू झाले. थोड्यावेळाने भांडण शांत झाले. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास मुलगा शौचास गेला असताना पुन्हा पती पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. आईच्या ओरडण्याचा आवाज आल्याने मुलाने तिकडे धाव घेतली. त्यावेळी भांडण विकोपाला जाऊन पतीने पत्नीच्या अंगावर धारदार हत्याराने हल्ला केला. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलालाही बापाने दरडावले. आईची गंभीर अवस्था पाहून मुलाने मदतीसाठी संपर्क केला.

गंभीर जखमी अवस्थेतील सुप्रिया यांना येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले; मात्र, त्यांचा मृत्यू झाला. मुलगा रिद्धेश (वय २७) याने फिर्याद विजयदुर्ग पोलिसांना दिली. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक एम. पी. सोनवलकर, हवालदार प्रशांत जाधव, विलास राठोड, गणेश भोवड, नाईक विक्रम कोयंडे, काँस्टेबल देवेंद्र मुंबरकर, संतोष डामरे आदींनी भेट दिली. उपविभागीय अधिकारी धनश्याम आढाव आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक खोपडे यांनीही भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान, संशयित पतीलाही रुग्णालयात दाखल केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT