Indian Bison
Indian Bison esakal
कोकण

Konkan News : गवे आता खऱ्या अर्थाने आपले शेजारी झालेत...

सकाळ डिजिटल टीम

माचाळ गावात गव्याने शेतकऱ्यावर केलेल्या हल्ल्याची बातमी वाचून मन एकदम विषण्ण झाले होते.

-प्रतीक मोरे, देवरूख Email ID: moreprateik@gmail.com

प्राचीन काळापासून भारतीय समाजाचं गौपरिवाराबरोबर नात राहिलेलं आहे. गाई, बैल यांचं पालन असो आणि त्यावर निर्मित पशुपालक समाजाचं आगमन असो, भारतीय संस्कृतीमध्ये (Indian Culture) अनन्यसाधारण महत्व या परिवाराचे आहे. प्रत्यक्षात मात्र गवा हा एक शाकाहारी भूचर प्राणी आहे. हा प्राणी भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेश व आग्नेय आशियाई देशांत आढळतो. याला इंग्रजीत इंडियन बायसन (Indian Bison) किंवा गौर असे म्हणतात.

गवा ही एक सगळ्यात उंच जंगली गाय (Wild Cow) आहे. आययुसीएन यादीमध्ये संकटग्रस्त प्रजाती म्हणून नोंद झाल्यानंतर मात्र गवा हे आता संरक्षणाचे केंद्र बनायला हवे होते; पण गेल्या काही वर्षात वाढता वन्यप्राणी, मानवसंघर्ष आणि सह्याद्रीच्या जंगलात निर्माण झालेला असमतोल अशा विविध कारणांनी गवे सतत चर्चेत आहेत.

माचाळ गावात गव्याने शेतकऱ्यावर केलेल्या हल्ल्याची बातमी वाचून मन एकदम विषण्ण झाले होते. गेले पाच-सहा वर्ष शार्दुल आणि मी गव्यांचे कळप ट्रॅक करत असताना आलेले अनेक अनुभव अंगावर सर्रकन काटा यावा तसे अनेकवेळा उभे राहतात आणि जंगलात वावरताना किती शांतचित्ताने वावरावं लागतं याची कायम जाणीव करून देत असतात. ट्रॅप कॅमेरा लावणं हे कायमचं अवघड काम राहिलेलं आहे. प्राण्यांच्या हालचाली ट्रॅक करताना अनेकवेळा तो प्रत्यक्ष प्राणीच समोर उभा ठाकण्याची शक्यता असते.

अनेकवेळा कॅमेरा लावून परत येताना किंवा पाणवठ्याच्या कडेला असे गव्याचे कळप अगदी जवळून उधळलेले अनुभवायला मिळतात. सुदैवाने, गवा हा मुद्दामहून हल्ला करणारा प्राणी नाही. चारही बाजूने कॉर्नर झाल्यास आणि आता पळायला जागा नाही, असे लक्षात आल्यास शेवटचा पर्याय म्हणून गवे समोरच्या बाजूस हल्ला करतात. इतर काही कारणाने अनेकवेळा गवे आक्रमक झाल्याची उदाहरणे आहेत; पण त्यात हल्ला करण्यात उद्युक्त करणाऱ्या मानवी चुका तेवढ्याच कारणीभूत आहेत. एकंदरीतच कोकणात गव्याचा वावर फक्त वाढलेला नाही तर आता सर्वदूर पसरलेला आहे. यात संघर्षही अनेक ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यामुळे उपरोक्त काळजी घेणे आता क्रमप्राप्त झालेले आहे.

शेतीपिकाचे नुकसान, गव्यांकडून क्वचित होणारे हल्ले आणि गुराख्यांमध्ये असणारी भिती या गोष्टींमुळे संघर्ष वाढतो आहे. त्याचबरोबर पूर्वी फक्त राधानगरी आणि चांदोली परिसर आणि दक्षिणेकडचा पश्चिम घाट यापुरते मर्यादित असलेले गवे गेल्या काही वर्षात अगदी समुद्रकिनारीही दिसून आले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील दुर्गम भागांमध्ये शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीच्या बऱ्याच तक्रारी ऐकायला येत आहेत आणि यातूनच विद्युतभारित तारांच कुंपण लावणे आणि फासक्यांच प्रमाण वाढत आहे. यातून एखादी दुर्घटना घडली की, मग याच गांभीर्य समोर येतं. यातूनच मग एखादी गवा मारल्याची घटना घडली असावी.

भोके गावात विहिरीतून सुटका करण्यात आलेला गवा ही याच कहाणीचं पुढं आलेलं दुसरं रूप. अलीकडे रायगड जिल्ह्यात गवे मिळाल्याचे समोर आले. गुहागर हेदवी वेळणेश्वर इथे २-३ वर्षांपासून गवे दिसत असल्याची माहिती आहे. गावखडी येथे तर समुद्रकिनारीही गवे आले आहेत. आम्हीही वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात गव्यांनी वेळोवेळी दर्शन दिलेलं आहे. त्यातील कॅमेऱ्यात चित्रबद्ध झालेले हे गवे अगदी मानवी वस्तीच्या जवळपास मिळालेले आहेत आणि यात वयाने कमी असलेले गवे स्थलांतर थियरीबद्दल विचार करायला लावणारे आहेत. यातून फक्त मानवीसंघर्ष टाळावा आणि लोकांमध्ये जनजागृती करून या घटना कमी करता याव्यात, अशी उपाययोजना करणं आवश्यक होत चाललंय.

सह्याद्रीच्या जंगलात लावले जाणारे वणवे आणि अनिर्बंध गुरेचराई, अवैध वृक्षतोड वेळीच थांबवली गेली नाही तर शहरी भागातही वन्यप्राणी अतिक्रमण करणार, हे क्रमप्राप्त आहे. गवे तसे आता कोकणभर पसरलेत...जंगलात फिरताना अनेकवेळा आजुबाजूच्या झुडपात जोरात हालचाल होऊन धरणीकंप व्हावा असा यांचा कळप उधळतो आणि त्या वेळी होणारी छातीची धडधड ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे. बहुतेक देवराया आणि आजुबाजूची शेतं, पायवाटा यांच्या पाऊलखुणांनी भरलेल्या दिसतात. सगळयाच रस्त्यावर एकदा ना एकदा तरी यांचा कळप आडवा जातोच... मळलेल्या गवतात यांच्या बसण्यामुळे झालेले गोलाकार भूतकाळात घेऊन जातात. गवे आता खऱ्या अर्थाने आपले शेजारी झालेत... गव्यांच्या शेणात उगवलेलं भात याचीच साक्ष देत वाढतंय.

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT