कोकण

रत्नागिरी - बालकांच्या विक्रीप्रकरणी एक मूल गुहागरात

CD

पान १


मूल विक्री प्रकरणात गुहागरचे दाम्पत्य ताब्यात
मुंबई पोलिसांची कारवाई : डॉक्टर महिला दलालासह सात जणांना अटक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : बालकांची विक्री करणाऱ्‍या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर एका मुलाची रत्नागिरी जिल्ह्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार तपासात पुढे आला आहे. याबाबात पोलिसांनी चौकशी केली असता गुहागर तालुक्यातील एका कुटुंबाने मुलाला विकत घेतल्याचे निष्पन्न झाले. मुंबई पोलिसांचे पथक काल गुहागरमध्ये येऊन संबंधितांना ताब्यात घेतल्याची खात्रिलायक माहिती असून, या प्रकरणाचे थेट रत्नागिरी कनेक्शन असल्याचे पुढे आले आहे.
पोलिसांनी बालकांची विक्री करणाऱ्‍या महिला दलालासह एकूण सात संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तसेच तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वंदना अमित पवार, शीतल गणेश वारे, स्नेहा सूर्यवंशी, नसिमा खान, लता सुरवाडे, शरद देवर आणि डॉ. संजय सोपानराव खंदारे यांचा समावेश आहे. सर्व संशयित आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये गुहागरमध्ये (जि. रत्नागिरी) एका कुटुंबाने बाळ विकत घेतल्याचे पुढे आल्यावर मुंबई पोलिसांचे पथक काल रत्नागिरीत येऊन संबंधितांना ताब्यात घेतल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.
मुलांची विक्री करणाऱ्या टोळीत एका डॉक्टरचाही समावेश आहे. फर्टिलिटी केंद्रामध्ये काम करणाऱ्‍या महिलांच्या मदतीने रॅकेट चालवले जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. या टोळीने आतापर्यंत १४ बालकांची विक्री केल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यातील एक बाळ रत्नागिरी जिल्ह्यात विकल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली.

दोन मुलांची सुटका
संशयित आरोपींनी विक्री केलेल्या बालकांमध्ये ११ मुले, तर तीन मुली आहेत. कमीत कमी पाच दिवस ते जास्तीत जास्त नऊ महिने असे विक्री केलेल्या बाळांचे वय आहे. आतापर्यंत १४ लहान बाळांची विक्री झाल्याचे समोर आले असून, दोन बाळांची सुखरूप सुटका करण्यात मुंबई पोलिसांना यश आले.

मुंबई पोलिसांचे पथक काल रत्नागिरीत आले होते. गुहागर येथील एका कुटुंबाने मूल विकत घेतले होते. संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
- धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood Alert: पुण्यात पूरस्थितीची चाहूल! खडकवासलातून मोठा विसर्ग, एकतानगरातील दोन सोसायट्यांत पाणी शिरले, महापौर नागुपरेंची पाहणी

IMD Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ओसरला; पाऊस थांबणार, मुंबईसह घाटमाथ्यांवर इशारा

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात पावसाचा तडाखा, माळीणजवळ दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

Ashadhi Wari: ४३ वर्षांची अखंड परंपरा कायम! गंगापूरहून १२०० वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ; भक्ती, शिस्त आणि परंपरेचा अनोखा संगम

Pune Rain Update : खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, मुठा नदीकाठच्या अनेक घरांत पाणी शिरले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT