IMD Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ओसरला; पाऊस थांबणार, मुंबईसह घाटमाथ्यांवर इशारा

Maharashtra Rain Alert : राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असली तरी पुणे व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा.
IMD Rain Forecast Maharashtra Alert

IMD Rain Forecast Maharashtra Alert

esakal

Updated on

Maharashtra Weather Update : कोकण, घाटमाथा आणि राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आता हळूहळू कमी होण्याची चिन्हे आहेत. मात्र, (८ जुलै) पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पालघर, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com