Kokan Politics raj thackeray narayan rane  sakal
कोकण

Kokan Politics: राज ठाकरे करणार राणेंचा प्रचार, या दिवशी घेणार कणकवलीत सभा

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Newsरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी (ता.४) कणकवली येथे जाहीर सभा होणार आहे.

या सभेच्या आदल्या दिवशी होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्यास या सभेत अंगावर आल्यास शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.

सावंत यांनी आज येथील हॉटेल लाईम लाईट येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपा केंद्रीय कार्यकारणी सदस्य बंड्या सावंत, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, मनसे तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, प्रदिप माने आदी उपस्थित होते.
श्री. सावंत म्हणाले, ‘‘गेले पंधरा दिवस महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सर्व स्तरातून बिनशर्त पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या विजयासाठी महायुतीचे सर्व घटक पक्ष एकदिलाने काम करीत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती विभागातील बैठका, सभांना चांगला प्रतिसाद लाभत आहे.

महायुतीचे घटक पक्ष असणारे मनसे पक्षप्रमुख ठाकरे हे शनिवारी कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला येत आहेत. या सभेच्या आदल्या दिवशी ३ मेस उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख ठाकरे यांचीही त्याच ठिकाणी जाहीर सभा होत आहे. या सभेत त्यांनी मोदी, राणेंविरोधी राजकारण केले असेल तसेच महायुतीच्या उमेदवारांवर आरोप-प्रत्यारोप केल्यास भाजप ४ मेच्या सभेत अंगावर आल्यास शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही." मनसे जिल्हाध्यक्ष परब यांनी श्री. राणे यांचा प्रचार उत्साहात सुरू आहे. गावपातळीवर प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने एक दिलाने काम करत असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून टीका; मनोज जरांगे पाटलांनी कराडच्या सभेत दिलं थेट उत्तर, म्हणाले...

Alephata Crime : मानसिक छळामुळे तरुणीने संपविले जीवन; शिक्षकावर गुन्हा दाखल

समृद्धीवर १२०च्या स्पीडने गाड्या धावतात, नो पार्किंगमध्ये कंटेनर लावला, गंभीर अपघाताची शक्यता; त्या चालकावर गुन्हा दाखल, आरटीओकडून कारवाई

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर अपघात; एन्डेवर चालक व दूचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

Viral Video : 'या' शहराच्या मातीत विखुरलय सोनं, लोक वेचून कमवाताहेत लाखो रुपये; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT