कोकण

दारूच्या नशेत सख्ख्या भावावर कोयत्याने वार

CD

दारूच्या नशेत सख्ख्या
भावावर कोयत्याने वार

न्हावेलीतील घटना, एकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ : दारूच्या नशेत सख्ख्या भावावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना न्हावेली-देऊळवाडी येथे आज सायंकाळी घडली. यात फिर्यादी अजय कृष्णा नाईक यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा लहान भाऊ किशोर कृष्णा नाईक याच्याविरुद्ध सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
न्हावेली-देऊळवाडी येथील अजय कृष्णा नाईक (वय ३०) यांनी आपला भाऊ किशोर कृष्णा नाईक (वय ४५) याला आईला शिवीगाळ का करतोस, अशी विचारणा केली. याचा मनात राग धरून किशोर नाईक याने अजय यांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यात अजय नाईक हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार करून सायंकाळी घरी पाठविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अधिक तपास पोलिस हवालदार सुभाष नाईक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : हैदराबाद गॅझेटचा प्रश्न मार्गी; कुणबी प्रमाणपत्रासाठी उद्यापासून अर्ज करा, जरांगेंचं आवाहन, नोंदी नसल्या तरी चिंता नाही

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या मनमाड नगरपरिषदेची उद्या पोटनिवडणूक

Maratha OBC Benefits : शासन आदेश! मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती, मृत आंदोलकांच्या मुलांना नोकरी मिळणार; मनोज जरांगेंची माहिती

Pune Water Crisis: पाण्यासाठी महिलांचा संताप अनावर! भीमनगरमध्ये रास्ता रोको; प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

Virat Kolhi Injury Update: विराट इंग्लंड दौऱ्यावर खेळणार का? दुखापतीमुळे झालाय संघाबाहेर, समोर आले नवीन अपडेट्स

SCROLL FOR NEXT