कोकण

उद्योग साकारताना

CD

११ (टूडे ३ साठी, सदर)

उद्योग साकारताना ......लोगो


- rat२१p५.jpg-
२४M८४९०७
प्रसाद अरविंद जोग


इंट्रो

जे उद्योजक वेळ आणि शब्द पाळतात, तेच खरे वेळेला व शब्दाला पक्के असणारे उद्योजक म्हणून यशस्वी होतात. वेळ व शब्द पाळण्याच्या त्यांच्या सवयीतून ते स्वत:च्या उद्योगाप्रती असलेली निष्ठा व वचन बद्धता दाखवून देत असतात. स्वतःच्या व दुसऱ्याच्या वेळेचा आदर करणे हे उद्योजकाने अंमलात आणावे असे महत्वाचे सूत्र आहे. वेळेचा सदुपयोग करून आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न हे उत्तम उद्योजकीय मानसिकतेचे द्योतक आहे. वेळ अनमोल असते आणि गेलेली वेळ पुन्हा येणे शक्य नसल्यामुळे वर्तमानात मिळणाऱ्या बहुमूल्य अशा वेळेचे सुयोग्य व्यवस्थापन करून उद्योजकीय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने प्रयत्न करणारे उद्योजकीय प्रवासात नेहमीच गतिशिल असतात. आजच्या लेखात वेळ पाळायची म्हणजे नक्की काय करायचे? वेळेचे व्यवस्थापन कसे व कोणत्या पद्धतीने करावे? वेळ... प्रत्येकासाठीच अमूल्य का आहे? या विषयांनाही स्पर्श केला आहे.

- प्रसाद अरविंद जोग
theworldneedit@gmail.com

-----

वेळ व्यवस्थापन

वेळ व्यवस्थापन हा स्वतःहून पुढाकार घेऊन शिकण्याचा व समजून घेण्याचा विषय आहे. वेळ व्यवस्थापन शास्त्र वेळेचे व्यवस्थापन कसे करावे हे उलगडून सांगते. उद्योजकतेचे प्रयोजन पूर्णत्वास नेण्यासाठी वेळ हा मुद्दा अतिशय महत्वाचा ठरतो. उद्योजकीय वाटचालीत वेळ व्यवस्थापन या विषयाकडे कटाक्षाने लक्ष देणाराच उद्योजक प्रभावी कामगिरी करू शकतो. वेळ पाळण्यासाठी दाखवलेली वचनबध्दता यामुळे उद्योग जगतात, त्या उद्योजकाबद्दलची विश्वासार्हता वाढीस लागते. वेळेचे गणित अचूक जाणणारा उद्योजक काळ, काम, वेग याकडे सजगतेने पाहत असतो. नियोजन, संयोजन, व्यवस्थापन व समायोजन यामुळे उद्योजकीय कार्य लवकर पूर्ण होऊ शकते. कारण कोणत्याही उद्योजकीय कार्याचे प्रयोजन केल्यानंतर त्याचे नियमन कसे करायचे हा एक महत्वाचा मुद्दा असतो. त्यासाठी निर्धारित वेळेत संपूर्ण कार्यक्षमतेने ते कार्य पूर्ण करणे अपेक्षित असते. त्यामुळे ग्राहकांना, बँकांना दिलेली वेळ व शब्द पाळला जाऊन उद्योजकाची उद्योग विश्वातील पत वाढते. थोडक्यात काय वेळ खूप महत्वाची असते आणि ती काटेकोरपणे पाळलीच गेली पाहिजे हे वाक्य उद्योजकांनी आवर्जून लक्षात ठेवलेच पाहिजे.

* वेळेच्या व्यवस्थापनाच्या महत्वाच्या गोष्टी ः
आजच्या अत्यंत व्यग्र व धकाधकीच्या जीवनशैलीत वेळेचं व्यवस्थापन करण्याची मोठी गरज आहे. वेळेच्या व्यवस्थापनामुळे एक उद्योजक म्हणून कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करता येतो आणि त्यानुसार कामे लवकर उरकता येऊ शकतात. उद्योगधंद्यात दिलेला शब्द महत्वाचा असतो. कामे वेळेवर आटोपल्यामुळे उद्योजकाला मनावरच्या ताणाची पातळी कमी करण्यास मदत होते. योजना आणि आखणी याला वेळापत्रकामध्ये महत्वाचे स्थान आहे, हे उद्योजकाने समजून वेळापत्रक तयार करावे. एक उद्योजक म्हणून नियमित वेळापत्रक तयार करताना मुख्य उद्दिष्ट काय आहे, हे आधी ठरवावे. कारण कोणत्याही नियोजन पद्धतीमध्ये उद्दिष्ट महत्वाचे असते. ते वेळेचे नियोजन करतानाही लक्षात घ्यावे लागते. उद्योजक म्हणून आपल्यासमोर नेहमीच एखादं उद्दिष्ट अथवा ध्येय असल्यास आपल्याला एक नवी प्रेरणा मिळते. नुसते काम न करता जर काही साध्य करण्यासाठी ते केले तरच, त्याला एक अर्थ प्राप्त होतो आणि अपेक्षित फळ मिळते. हे उद्योजकांनी नेहमी लक्षात ठेवलेच पाहिजे.
प्राधान्यक्रम ठरवता येणे हे एक महत्वाचे सूत्र आहे. ज्याला प्राधान्यक्रम ठरवता येतात त्यालाच आयुष्यात प्रगतीचा चढता क्रम पार करता येऊ शकतो. कामाचं प्राधान्य लक्षात घेऊन एकापाठोपाठ एक काम उरकणं शक्य होते. कामांची यादी बनवणं म्हणजेच चेकलिस्ट तयार करण्याचं तंत्रही प्रत्येकाने शिकून घेण्यासारखेच आहे. दिवसभरात कोणकोणती कामं करायची, याची आखणी उद्योजकाने व त्याच्या सहकाऱ्यांनी मनाशी करायला हवी. कामांची यादी आदल्या दिवशी झोपण्यापूर्वी किंवा सकाळी सुध्दा करता येऊ शकते. त्यामुळे कॅलेंडर किंवा कामाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेता येतं किंवा कामांची यादी करून आवश्यकतेनुसार त्यात बदलही करता येऊ शकतो. (वेळेचे समायोजन)
योग्य गोष्टी योग्य तऱ्हेने करण्याकडे कल विकसित होत जातो. योग्य त्या गोष्टी योग्य वेळी केल्यानं अपेक्षित परिणाम साधला जाऊ शकतो व वेळ पाळण्याकडे उद्योजक अधिक आवडीने लक्ष देतो. अनावश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची कला अंगी येते अथवा जरुरी असेल तेव्हा नाही म्हणायला शिकता येते. वेळच मिळत नही, अशी लटकी सबब सर्वसाधारण उद्योजक नेहमीच सांगतात. पण वेळेचे योग्य नियोजन केले, कामाचे वेळापत्रक आखले तर यश दूर नसते, हे ज्या उद्योजकाला कळते त्याचा कामाचा उत्साह वाढतो.
मोठे झाल्यावर काय करायचे, हे अनेकजणं लहानपणी ठरवतात. तरीही पुढे ते तसेच होतात असे नाही. कारण त्यादृष्टीने ते मोठे झाल्यावर कधीच गांभीर्याने पाहत नाहीत. त्यासाठी आवर्जून प्रयत्न केलेले नसतात. पण उद्योजकीय भान ठेवून योग्य वेळ, व्यवस्थापन तंत्र अवगत झाले तर मोठी भरारी घेता येऊ शकते. यशाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगवेगळी असू शकते. यशाची रूपेही अनेक आहेत. त्यामुळेच यशाच्या व्याख्याही अनेक आहेत. पण वेळ पाळता येणे, ही यश मिळविण्यासाठी महत्वाची आहे. वेळेचे काटेकोरपणे पालन करता येणे जास्तच महत्वाचे आहे.

* वेळेचे व्यवस्थापन तंत्र ः या जगात सर्वांना विधात्याने सारखा वेळ दिलेला आहे. कोणालाही दिवसाचे २५ तास दिलेले नाहीत. असे असूनही काहीजण यशस्वी तर काही अपयशी का होतात? तर याचे मूळ कारणच वेळेचे व्यवस्थापन या घटकाशी निगडित आहे. जो मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करतो, तो यशस्वी होतो आणि हे ज्याला जमत नाही तो अपयशी ठरतो. महत्वाच्या कामांना अधिक वेळ देवून कमी महत्वाची कामे नंतर केली तर वेळेचा योग्य वापर होतो. दिवसाचे तयार केलेले वेळापत्रक सतत समोर राहील, अशा ठिकाणी लावले तर उद्योजक म्हणून त्याचा निश्चितच फायदा होईल. अशा प्रकारे वेळेचं योग्य नियोजन केल्यास ध्येय प्राप्त करणे सोपे जाईल. उद्योजकता म्हणजे वचनबद्धता. उद्योजकता म्हणजे शिस्त. उद्योजकता म्हणजे आपल्या शब्दाला, वायद्याला पक्के असणे होय

* वेळेचे नियोजन करण्यासाठीच्या सोप्या क्लृप्त्या ः
१) कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा उदा. अति महत्वाची, तातडीची, महत्वाची, कमी महत्वाची आदी.
२) दैनंदिनी अथवा डायरीचा वापर करावा.
३) डोन्ट अँड डू लिस्ट बनवून त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करावा.
४) योग्य त्या वेळीच योग्य ते काम उरकून घेण्याकडे कल असावा.
५) स्वतःचा दिनक्रम ठरवून घ्यावा व तो पाळावा
६) रिमाइंडर्सचा उपयोगही जरूर तेथे करता येऊ शकतो.
७) वेळ व्यवस्थापन या विषयाकडे गांभीर्याने बघावे
८) वेळ अनमोल आहे व अमुक वेळेतच ते काम करावयाचेच आहे असे स्वयं सूचना देण्याचा प्रयत्न करावा.
९) वेळ वाया जात नाही ना, या कडे उद्योजक म्हणून स्वतःच निरीक्षण करावे
-------------
(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: 'काही गोष्ट स्पष्ट करायच्यात, माझ्या दुखापतीबद्दल बोलणारे...' सूर्याने सांगितलं सत्य नेमकं काय? फॉर्मवरही भाष्य

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही? ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT