कोकण

काजळीतील 10 हजार घनमीटर गाळ काढला

CD

६ (टूडे १ साठीमेन)


- rat२१p१३.jpg-
२४M८४९५८
संगमेश्वर ः काजळीतील गाळ काढल्यामुळे नदीपात्र सपाट झाले आहे.
- rat२१p१४.jpg-
२४M८४९५९
गाळाची पाहणी करताना पदाधिकारी व समिती सदस्य.
-----------
काजळीतील १० हजार घनमीटर गाळ काढला

शिपोशी, किरबेटजवळ मोहीम ; लोकसहभागातून निधी संकलन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः चला जाणू या नदीला या उपक्रमांतर्गत काजळी नदीतील गाळ लोकसहभागातून काढण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. आतापर्यंत संगमेश्‍वर तालुक्यातील शिपोशी आणि किरबेट येथील सुमारे १० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. हे काम ५ जूनपर्यंत चालू राहणार आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी निधी संकलन केले असून गाळ काढण्यासाठीचे मशीन खासगी संस्थांकडून घेण्यात आले आहे.
सह्याद्रीच्या डोंगररागांमधून वाहत येणाऱ्या काजळी नदीमध्ये ठिकठिकाणी दगड, माती साचले आहेत. नदीपात्र गाळाने भरून गेले असून कोंडीत पाणीच साठत नाही. बारमाही साचणाऱ्या पाण्यातील मासे पकडून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी नदी संवर्धन अमृतवाहिनी चला जाणू या नदीला अभियानांतर्गत गाळमुक्त काजळी नदी असा उपक्रम ग्रामपंचातीसह ग्रामस्थांच्या लोकसहभागातून, सेवाभावी संस्था आणि जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. किरबेट भोवडेवाडी, शिपोशी येथील नदी खोलीकरणाला सुरवात झाली आहे. यासाठी अशासकीय राज्य समिती सदस्य डॉ. सुमंत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य अनिल जयराम कांबळे, रोहन रमेश इंगळे, सरपंच अस्मिता अडबळ, रेवती निंबाळकर, मनोज जायगडे, माधवी जायगडे, मुकुंद बाईंग आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गाळ काढण्याचे काम गेले पंधरा दिवस सुरू आहे. यासाठी यशोदा अर्थ मुव्हर्स अँड मोटर्स कोल्हापूर या सेवाभावी संस्थांने मशीन उपलब्ध करून दिले आहे.
किरबेट आणि शिपोशी येथे दररोज गाळ काढण्याचे किमान पाच ते सहा तास काम केले जाते. मशिनच्या साह्याने काढलेला गाळ नदी किनाऱ्यापासून प्रवाहाच्या प्रभाव क्षेत्रात येणार नाही अशा ठिकाणी टाकण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये सुमारे ९० तासाहून अधिक काम झाले आहे. दिवसाला सरासरी ८० ते ९० लिटर इंधन मशिनला लागत आहे. यासाठी लागणारा खर्च हा स्थानिक ग्रामस्थांनी निधी संकलनातून केला आहे. किरबेटमधून सुमारे ७ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. शिपोशीमधून तीन हजार घनमीटर गाळ काढल्याचे डॉ. सुमंत पांडे यांनी सांगितले. पाऊस पडेपर्यंत हे काम सुरू राहणार असल्यामुळे येथील बऱ्‍यापैकी परिसरातील गाळ काढला जाणार आहे.
------
किनाऱ्यावर गॅबियन बंधारा

किरबेट येथे नदी किनाऱ्यावर गॅबियन टाईप बंधारा बांधण्याबाबत निर्णय झाला आहे. त्यासाठी आवश्यक जाळ्या लोकसभागातून मिळवण्यात येणार आहेत. तसे झाले तर नदीपात्रातून काढलेला गाळ त्या जाळ्यांमध्ये भरून त्यापासून हा बंधारा बनविण्यात येणार आहे.
----
कोट
पावसाळ्यात मोजकेच दिवस पूर येतो. गेली अनेक वर्षे गाळ काढण्याकडे लक्ष दिले नव्हते. त्यामुळे हे काम एका वर्ष नाही तर पुढील दोन वर्षे करावे लागणार आहे. सध्या किरबेट, शिपोशीत चांगले काम झाले आहे. ग्रामस्थांनी चांगल्याप्रकामरे पैसे जमवले आहेत. यामध्ये तरुणांचा सहभाग महत्वाचा आहे. काजळी नदीतील जैवविविधता अबाधित राहावी यासाठी लोकसहभागातून प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. सुमन पांडे, अशासकीय सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune weather: जूनच्या स्वागताला पावसाची चाहूल; पुण्यात मेघगर्जना आणि विजांचा इशारा, नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती

IPL 2026: RR चा फक्त १ कोटीचा जुगार; १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने ३३.८७ कोटींचा नफा कसा कमावला? पाहा संपूर्ण गणित

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात थरारक घटना; मुरुम चोरी उघडकीस आणणाऱ्या तरुणांचा पाठलाग जीवावर बेतला, जेसीबीच्या धडकेत एकाचा मृत्यू

मुलीला वाचवायला ५ जणांनी नदीत उड्या मारल्या, पाचही जण बुडाले, मुलगी वाचली

Latest Marathi News Live Update : ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष पेटवून सत्तेची खुर्ची मजबूत करण्याचा सरकारचा डाव; वडेट्टीवारांचा आरोप

SCROLL FOR NEXT