कोकण

सावंतवाडी तालुक्यात राहूल गावडे अव्वल

CD

84998

सावंतवाडी तालुक्यात गावडे अव्वल

९९ टक्के निकाल ः वैष्णवी भांगले द्वितीय

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात बारावीचा तालुक्याचा निकाल ९९ टक्के लागला. तालुक्यातून परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या १७०५ विद्यार्थ्यांपैकी १६८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात राणी पार्वतीदेवी हायस्कूल हायस्कूलचा राहुल गावडे ९२.८३ टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम तर त्याच हायस्कूलची वैष्णवी भांगले ९२.५० गुण मिळवित द्वितीय, बांदा खेमराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी रिद्धी तळगांवकर ९१.८३ टक्के गुणांसह तृतीय ठरली. मिलाग्रीस हायस्कूलची विद्यार्थिनी सना चोडणेकर ९१.६७ टक्के गुण मिळवित चतुर्थ ठरली. तालुक्यातील इतर प्रशालांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
तालुक्यातील प्रशालांचा निकाल असा ः श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा निकाल ९९.६५ टक्के एवढा लागला आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागात २८६ पैकी २८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेत साईश कांबळी ८६.३३, सानिया आंगचेकर ८४.६७, मॅकलीन लोबो ८२.३३ यांनी अनुक्रमे यश पटकावले. कला विभाग ः सानिया आंगचेकर (८४.६७), दिशा नाईक (७५.८३), सोनालीका पेडणेकर (६५.३३). वाणिज्य ः सोहा सावंत (७८.५०), निशिगंधा सावंत (७४.८३), प्रिती पुरोहित (७७.३३). विज्ञान ः साईश कांबळी (८६.३३), मॅकलीन लोबो (८२.३३), लावण्या रेडकर (८२).
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, राजकन्या उर्वशीराजे भोंसले तसेच प्राचार्य, उपप्राचार्य व प्राध्यापक तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाकडून अभिनंदन करण्यात आले. राणी पार्वती देवी ज्युनिअर कॉलेजचा कला ९९.६२ टक्के, वाणिज्य ९९.६९, विज्ञान ९९.६२ तर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचा निकाल १०० टक्के लागला. भक्ती गुडगीळ हीने अकाउंटन्सी विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. श्रावणी रासम, सिद्धार्थ आडेलकर, आदिती चव्हाण, तन्मय गवस, सिमरन पास्ते यांनी आयटी विषयात १०० गुण मिळवत विक्रम रचला. कला ः खुशी रेडकर (८७.५०), स्नेहल गावडे (८५.५०), सेजल नाईक (८४). वाणिज्य ः वैष्णवी भा़ंगले (९२.५०), धनेश नाईक (९१), आर्या कुरतडकर (९०.६७). विज्ञान ः राहुल गावडे (९२.८३), पार्थ राऊळ (९०.५०), श्रावणी रासम व सलोनी कोटकर (८७.१७). कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ः निलेश सावंत (६२.३३), वासुदेव गावडे (५९), धनश्री राऊळ (५८.३३). मिलाग्रीस हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. विज्ञान आणि वाणिज्य विभागातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रशालेत विज्ञान ः स्वरा दळवी (८३.१७), आयडोनिया परेरा (८०.१७), सेबास्टियन सालदान्हा (७७.८३). वाणिज्य ः सना चोडणेकर (९१.६७), रोशनी सावंत (८८.१७), डेन्झिल डिसोझा (८३.६७). कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९६.४२ टक्के लागला. कला शाखेतील प्रविष्ठ २८ पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थी असे ः स्नेहा कोचरेकर (७९.३३), बाया आडवे (७४.१७), विक्रम वडार (७१.८३), सिया वैद्य (७०). धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. विज्ञान ः प्रणव नाईक (९०), संकेत देसाई (८५), इशा महाजन (८३.३३). कला ः जानवी ठाकूर (८८), कमल वडार (८७), संकल्प गवस (८५.१७). वाणिज्य ः सानिया मयेकर (८१), तनय केसरकर (७८.५०), दिपराज सावंत (७६.५०). व्हर्टिकल्चर ः नयन डिंगणेकर (५४.१७). अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट ः रिद्धी तळगावकर (९१.८३), आकांक्षा सावंत (९०.३३), नेहा ठाकूर (९०.१७). इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी ः मनोहर गावडे (७६.१७), गौरेश वालावलकर (७४.६७), पार्थ चव्हाण (७४.१७). पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे ः वाणिज्य ः गौरवी खोत (७०.६७), ऋतिका राऊळ (६६), यतिन गावडे (६३.३३). कला ः वेदांत मुळीक (७५.८३), निमिषा धुरी (६१.१७), राजेश बिर्जे (६०). आंबोली सैनिक स्कूलचा १०० टक्के निकाल लागला. एकूण ३८ विद्यार्थी या प्रशालेतून परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. अॅलेक्स सावंत (८६), अजय गावकर (८१.१७), सुयश कदम (८०.३३). श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तळवडेचा निकाल ९१.१३ टक्के लागला. ३४ पैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला ः सानिका गोसावी (७१.१७), सिद्धेश जाधव (६१.१७), आत्माराम परब (५९). सांगेली महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. प्रशालेतून परिक्षेला एकूण १०२ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. कला ः अक्षता हक्की (७०.८०), शुभम पवार (५७.३३), कनिषा चव्हाण (५४.१७). वाणिज्य ः खुशी राऊळ (७६.६७), मंजुषा राऊळ (६८.१७), विद्या राऊळ (६७.५०). विज्ञान ः प्रतीक्षा गावडे (७७.५०), देवांक सावंत (७३.६७), इशा सांगेलकर (७३.५०). विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा निकाल ८५ टक्के लागला. तेजल शेळके (७८.८३), सोनाली नाईक (७२), संजना आरोसकर (६७.६७).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: ‘आधी सुरक्षित महामार्ग द्या, मगच टोल घ्या!’; कोकणवासीयांचा खारपाडा टोलनाक्यावर एल्गार, मुंबई-गोवा महामार्गावरील कामांवर संताप..

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू; अभिनेत्याने शेअर केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : जनगणना परिषद आयोजनाच्या पार्श्वभूमीवर सावता परिषदकडून नियोजन बैठकीचे आयोजन

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म ! पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT