85007
85008
हर्षदा शेटकर दोडामार्गात अव्वल
निकाल १०० टक्के ः कुडासे कॉलेजची अनुष्का राऊत द्वितीय
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २१ : तालुक्याचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला. दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी हर्षदा शेटकर (८५.१७ टक्के, वाणिज्य शाखा) तालुक्यात प्रथम आली. सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कुडासे या कॉलेजची विद्यार्थिनी अनुष्का राऊत (८४.६७ टक्के, विज्ञान शाखा) हिने द्वितीय क्रमांक मिळविला. याच कॉलेजचा विद्यार्थी पुंडलिक कोतेकर (विज्ञान शाखा) व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशीचा विद्यार्थी धनंजय खरवत (वाणिज्य शाखा) या दोघांना ८२.५० टक्के एवढे समान गुण मिळाल्याने दोघेही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
तालुक्यातील तीन ज्युनियर कॉलेजमधून एकूण ३२५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज दोडामार्गचे एकूण १७८ विद्यार्थी, सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कुडासेचे १०३ विद्यार्थी व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशीचे ४४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सर्व विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
तालुक्याचा महाविद्यालयनिहाय निकाल असा ः दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज दोडामार्गचा तिन्ही शाखांचा निकाल १०० टक्के लागला. कला शाखा- श्रद्धा रेडकर (६९.१७), आवडे शिरोडकर (६७ टक्के), दीक्षा कुबल (६४.६७). वाणिज्य शाखा-हर्षदा शेटकर (८५.१७), सेजल गवस (८०.५०), साक्षी राऊळ व सानिया गौंडळकर (७८.६७). विज्ञान शाखा-पियुष मोरजकर (८१.६७), अर्पिता कारेकर (७२.१७), चैतन्या हंडे (७१.५०). न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशीचा दोन्ही शाखांचा निकाल १०० टक्के लागला. कला शाखा-कौसर नदाफ (६९.५०), विघ्नेश गवस (६८.५०), तन्वी नाईक (६४.६७). वाणिज्य शाखा-धनंजय खरवत (८२.५०), मंगला गवस (८२.३३), दीपा हरिजन व प्रथमेश गवस (७१.८३). सरस्वती विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कुडासे महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. यात अनुष्का राऊत (८४.६७), पुंडलिक कोतेकर (८२.५०) व अदिती देसाई (७३.८३) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.