कोकण

नकली दागिने गहाण ठेवून १८ लाख २१ हजाराची फसवणूक

CD

१७ (पान ३ साठी)

नकली दागिने प्रकरणी तिघांवर गुन्हा

१८ लाख २१ हजारांची फसवणूक ; बँकेची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २१ ः नकली दागिने गहाण ठेऊन कर्ज काढून बॅंका, पतसंस्थांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन संशयितांविरुद्ध पहिला गुन्हा पूर्णगड पोलिस ठाण्यात दाखल झाला. संशयितंनी ४४४.३०० वजनाचे बनावट दागिने गहाण ठेवले. त्याद्वारे १८ लाख २१ हजार कर्ज उचलून बॅंक ऑफ इंडियाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
अमेय सुधीर पाथरे (वय ३४, रा. खांबडवाडी, पावस), अमोल गणपती पोतदार (४७), प्रभात गजानन नार्वेकर (३२, दोन्ही रा. कोल्हापूर) या तीन संशयितांवर गुन्हा दाखल आहे. या तिघानी संगनमताने बॅंकेत ४४४.३०० वजनाचे १३ चैन व २ ब्रेसलेट असे बनावट दागिने गहाण ठेवले. त्याद्वारे १८ लाख २१ हजार कर्ज उचलले. स्थानिक गुन्हे शाखेने नुकताच एका घरफोडीचा तपास करताना हे प्रकरण पुढे आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर हा प्रकार बॅंकेच्या लक्षात आला. बँकेने पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यामध्ये संशयितांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यांना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अनेक पतसंस्था आणि बॅंकांमध्ये त्यांनी नकली दागिने ठेऊन तारण कर्ज प्रकरणे केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी वाचवा! एक लीटर पाण्यात अंघोळ, RSSच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत असल्याचा VIDEO VIRAL

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Solapur Vidhansabha BJP: सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपचा सस्पेन्स कायम; उमेदवारीवरून भाजपमध्ये चुरस, कोणाला मिळणार संधी?

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

"आमिर आणि माझ्या नात्याला नाव मिळालं नाही" पूजा भट्टचा धक्कादायक खुलासा; नात्याबद्दल म्हणाली..

SCROLL FOR NEXT