IPL 2026 Final, RCB vs GT live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सलग दुसरे जेतेपद... रजत पाटीदारची रोहित, धोनीसह बरोबरी

IPL 2026, Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans live updates : आयपीएल २०२६ स्पर्धेत आज अंतिम सामना होत आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होत आहे. या सामन्याबद्दल लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या.
IPL 2026 Final | RCB vs GT Live

IPL 2026 Final | RCB vs GT Live

Sakal

Updated on

IPL 2026, RCB vs GT Final Marathi News: आयपीएल २०२६ स्पर्धेचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जिंकले. अहमदाबादमध्ये बंगळुरूने सलग दुसरे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला ५ विकेट्सने पराभूत केले. बंगळुरूने गेल्यावर्षी पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती, त्यानंतर आता त्यांनी सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले.

अंतिम सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १५५ धावा केल्या. त्यानंतर १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग बंगळुरूने १८ षटकात ५ विकेट्स गमावत १६१ धावा करत पूर्ण केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com