कोकण

पावशी येथे आजपासून पादुका दर्शन सोहळा

CD

87169

पावशी येथे आजपासून
पादुका दर्शन सोहळा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः आदमापूर निवासी श्री संत बाळूमामांच्या पादुकांचे आगमन पावशी येथे आज झाले. यानिमित्ताने शांतादुर्गा मंगल कार्यालय, पावशी येथे उद्या (ता. २) व सोमवारी (ता. ३) पादुका दर्शन सोहळा व भंडारा उत्सव आयोजित केला आहे.
उद्या पहाटे ६ वाजता श्री संत बाळूमामांचे नामस्मरण, सकाळी ७.३० वाजता मुख्य यजमानांच्या हस्ते श्रींचे षोड्शोपचारे पूजन, ८.३० वाजता विणापूजन व ग्रंथ पारायण प्रारंभ, ११ वाजता श्री संत नामदेव महाराज भक्त मंडळ, सिंधुदुर्ग यांचे नामस्मरण व भजन, दुपारी १ वाजता महाआरती, १.३० वाजता महाप्रसाद प्रारंभ, ३ वाजता संगीत हरिपाठ (सादरकर्ते-जीवन विद्यामिशन, मांडकुली), सायंकाळी ४.३० वाजा पारंपरिक फुगड्या (सादरकर्ते-सखी फुगडी मंडळ, पावशी), सायंकाळी ५.३० वाजता संदेश सामंत आणि सहकारी (झाराप) यांचे भक्तिगीत गायन, ६.३० वाजता गजानृत्य, ७ वाजता वारकरी हरीपाठ (सादरकर्ते-रामकृष्ण हरीपाठ मंडळ, पावशी), रात्री ८ वाजता पारंपरिक फुगड्या (सादरकर्ते-भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ, कुडाळ), ९ वाजता श्री ब्राह्मणदेव भजन मंडळ, अणावचे बुवा किशोर पारकर यांचे भजन होणार आहे. त्यांना मृदंगमणी कृष्णा परब, तबला वादक किरण खरात यांची संगीत साथ असेल. सोमवारी (ता. ३) सकाळी ६ वाजता श्री संत बाळूमामांची काकड आरती, ७ वाजता पादुका पूजन व ग्रंथ पारायण प्रारंभ, १० वाजता ग्रंथ पारायण सांगता, १०.३० वाजता भाऊ नाईक (वेतोरे) यांचे काल्याचे कीर्तन, दुपारी १२.३० वाजता रासलीला नृत्य व दहीहंडी, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थित राहावे, असे आवाहन श्री बाळूमामा प्रतिष्ठान, सिंधुदुर्गने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

Xiaomi 18 Pro Series होणार लाँच! 8500mAh बॅटरी, ड्युअल 200MP Leica कॅमेरा; पाहा नव्या फ्लॅगशिपचे भन्नाट फीचर्स!

Mumbai Water Metro: मुंबई वॉटर मेट्रोसाठी समुद्रतळाचा मोठा अडथळा; खडकाळ भागात ‘रॉक ड्रेजिंग’, २५० किमी जलमार्गांचा विकास

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT