कोकण

खेड-महामार्गावर पाच हजार रोपांची लागवड होणार

CD

87710
87711

महामार्गावर पाच हजार रोपांची लागवड होणार
खेड ते महाड; ठेकेदार कंपनीकडून वृक्ष लागवड करून घेणार
सकाळवृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ : मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा हिरवा केले जाणार आहे. खेड, पोलादपूर, महाड या भागात पाच हजार नव्या रोपांची लागवड केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता अमोल माडकर यांनी दिली. त्यासाठी खड्डे मारण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे शिवाय वृक्षारोपणासाठी रोपांची उपलब्धता करण्यात आली आहे.
रस्त्याच्या मध्यभागी वृक्ष लागवड करून ती जोपासण्यासाठी महामार्ग कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत तसेच रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे, असे माडकर यांनी सांगितले. पनवेल-पळस्पे इथून इंदापूरपर्यंत पहिला टप्पा आणि त्यानंतर इंदापूर ते कशेडी असा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. पुढे कशेडीपासून थेट सिंधुदुर्गपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सरकारने सुरू केले आहे. या संपूर्ण कामामध्ये महामार्गाच्या दुतर्फा असलेले महाकाय वृक्षांचा बळी गेला. यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या डोक्यावरील सावली नष्ट झाली. महामार्गावर थांबून थोडा वेळ आराम करता येईल, अशी परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे महामार्गावर प्रचंड उष्णता निर्माण झाली आहे. चिपळूणमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बैठका घेऊन वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर परशुराम घाट ते कशेडी घाट रस्त्याच्या चौपदरीकरणाची जबाबदारी असलेल्या महाड येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता येथील उपअभियंता अमोल माडकर म्हणाले, चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून आम्ही शंभर टक्के वृक्ष लागवड करून घेणार आहोत. ही मोहीम सुरू आहे. प्रत्येक वर्षी झाडे लावली जात आहेत; मात्र उन्हामुळे ती सर्व जगतात असे नाही. झाडे सुकली तर त्या खड्ड्यात दुसरी झाडे लावण्याचे नियोजन करत आहोत. पंधरा वर्षापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

कोट
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा ठिकठिकाणी खड्डे मारण्याचे काम सुरू आहे. हे खड्डे चार बाय चार आकारचे आहेत. यात वड, पिंपळ तसेच कणेर फुलांची आणि महामार्गाच्या कडेला उंच वाढणारी जंगली झाडे लावली जात आहेत. ही रोपे आता लहान आहेत. पुढील पाच वर्षानंतर ती वाढलेली दिसतील. पाऊस सुरू होताच महामार्गालगत वृक्षारोपणाला सुरवात होणार आहे.
- अमोल माडकर, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग महाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT