कोकण

महायुतीतील २ पक्षातील नेत्यांमध्ये रत्नागिरीत राडा

CD

महायुतीमधील दोन नेत्यांमध्ये राडा

रत्नागिरी, ता. ६ : शहरातील विठ्ठलमंदिर परिसरात महायुतीतील दोन पक्षांतील नेत्यांमध्ये जोरदार राडा झाला. शिंदेगटाच्या शाखाप्रमुखाला भाजपच्या माजी नगरसेवकांकडून मारहाण करण्यात आल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. तक्रारीवरून माजी नगरसेवकासह त्याच्या भावावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील नवीन भाजीमार्केट परिसरात राहणारे शिंदेगटाचे शाखाप्रमुख मिलिंद देवरूखकर यांनी याबाबतची तक्रार दिली. देवरूखकर हे भाजपचे माजी नगरसेवक राजू तोडणकर व भाऊ परेश तोडणकर हे तिघे बोलत बसले होते. त्यांचा कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले अन् शाखाप्रमुख मिलिंद देवरूखकर यांना माजी नगरसेवक राजू तोडणकर व त्याचे बंधू परेश तोडणकर यांनी मारहाण केली. या घटनेनंतर मिलिंद देवरूखकर यांनी काल रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. भाजपचे माजी नगरसेवक राजू तोडणकर व त्याचे भाऊ परेश तोडणकर यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंचे आदेश मनमानी करणारे अन् एकतर्फी, FDA कारवाईविरोधात हायकोर्टात याचिका दाखल

Gold Rate Today: 2 दिवसांच्या तुफान वाढीनंतर सोनं घसरलं! महाराष्ट्रात आज 24, 22 आणि 18 कॅरेटचा भाव किती?

Latest Marathi Live Update: राष्ट्रीय कामाच्या नावाखाली शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम

Buddha Vihar Fund Controversy : थिबाराजाकालीन बुद्धविहारासाठी मंजूर झालेल्या कोट्यवधींच्या निधीवरून पेटला वाद; थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?

Koyna Dam Water Storage Latest Update : कोयना धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली! येत्या काही दिवसांत विसर्ग? महाबळेश्वरसह नवजात धुवांधार पाऊस, पाहा आजचा पाणीसाठा

SCROLL FOR NEXT