कोकण

मळगाव, इन्सुली घाटीतील धोकादायक झाडे तोडणार

CD

88655

मळगाव, इन्सुली घाटीतील धोकादायक झाडे तोडणार

प्रांताधिकाऱ्यांची माहिती ः ‘सामाजिक बांधिलकी’ने वेधले होते लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः सावंतवाडी शहरासह मळगाव, इन्सुली घाटी व सावंतवाडी ते झाराप महामार्गाच्या बाजूला असलेली धोकादायक झाडे येत्या काही दिवसातच तोडण्यात येणार असून शहरातील धोकादायक झाडे प्रशासनाकडून तोडण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी आज दिली. या समस्येबाबत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे पाठपुरावा केला होता.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील तसेच सावंतवाडी-झाराप महामार्ग, इन्सुली व मळगाव घाटी येथील रस्त्यावरील धोकादायक झाडे तोडण्याकरिता प्रांताधिकारी व वन विभाग अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. शहरातील रस्त्याच्या बाजूला जीर्ण झालेली झाडे, रस्त्यावर झुकलेल्या झाडांच्या धोकादायक फांद्या तात्काळ तोडाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकीतर्फे पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल, असेही आश्वासन दिले होते. सामाजिक बांधिलकीच्या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने पावसाआधीच शहरातील धोकादायक झाडे तोडण्यास सुरुवात केली आहे. तसेच दोन्ही घाटीतील व सावंतवाडी ते झाराप रस्त्याच्या बाजूला असलेली
धोकादायक झाडे येत्या काही दिवसात तोडण्यात येतील, अशी माहिती प्रांताधिकारी निकम यांनी सामाजिक बांधिलकीच्या पदाधिकाऱ्यांना आज दिली. याबद्दल प्रतिष्ठानतर्फे अधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, सचिव समीरा खालील व रवी जाधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Energy Drink Action : पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसारख्या कंपन्यांना तुकाराम मुंढेंचा तगडा दणका; 'एनर्जी ड्रिंक' शब्द लिहल्यास थेट कारवाई

Viral Video : पुण्यात झाडांना भर पावसात टँकरने पाणी... व्हिडिओ व्हायरल, पण सत्य काय?

Latest Marathi Live Update: पोह्यात आळी, भातात झुरळ; विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर वसतिगृहाच्या भोजनालयावर कठोर कारवाई

Kolhapur Rain Update : राजारामसह सात बंधारे पाण्याखाली, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला; धरणक्षेत्रात कोसळधार, पंचगंगेची पातळी किती फुटांवर?

Sugar Factory : साखर कारखान्यांना दराचा गोडवा; आठवडाभरात ओलांडला प्रतिक्विंटल चार हजारांचा टप्पा

SCROLL FOR NEXT