Tukaram Mundhe Energy Drink Action : पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसारख्या कंपन्यांना तुकाराम मुंढेंचा तगडा दणका; 'एनर्जी ड्रिंक' शब्द लिहल्यास थेट कारवाई

Tukaram Mundhe action : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'एनर्जी ड्रिंक' असा दावा करणाऱ्या उत्पादनांवर कठोर भूमिका घेतली आहे. पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसह कंपन्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला.
Tukaram Mundhe Energy Drink Action maharashtra

Tukaram Mundhe Energy Drink Action maharashtra

esakal

Updated on

Energy Drink Labeling : राज्यात सुरू असलेल्या 'सेव्ह ड्रग, सेव्ह फूड' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तथाकथित 'एनर्जी ड्रिंक' विकणाऱ्या कंपन्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसह १० ते १२ कंपन्यांना ३० जून रोजी नोटीस बजावण्यात आली असून, उत्पादनांवर 'एनर्जी ड्रिंक' असा उल्लेख करण्यास कायद्यानुसार परवानगी नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. याशिवाय शैक्षणिक संस्थांच्या ५०० मीटर परिसरातील विक्रीबाबतही लवकरच कठोर आदेश जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com