कोकण

विकास संस्थेतून लवकरच बँक सेवा

CD

विकास संस्थेतून लवकरच बँक सेवा

मनीष दळवी ः सिंधुदुर्गनगरीत जिल्हा बँक वर्धापनदिन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ ः आम्ही महिला ग्राहकांपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. यासाठी बँक सखी म्हणून नियुक्त करणार आहोत. तसेच पिग्मी एजंट आणि मायक्रो एटीएम सेवा यामुळे जिल्हा बँकेच्या वृद्धीत वेगाने वाढ होत आहे. ग्राहकांना अधिकाधिक वेगाने सेवा देण्यासाठी कृती कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यात विकास संस्थांमध्ये बँकेच्या सर्व सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ग्राहकांना बँक शाखेत जाण्याची गरज पडणार नाही. बँकेची सेवा विकास संस्थेत मिळेल. २५० कोटी रुपये शेती कर्ज वितरित करीत आहोत. ते आम्हाला ३५० कोटी करायचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ४१ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात केले.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात बँकेचा ४१ वा वर्धापनदिन आणि कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्ष दळवी यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक आत्माराम ओटवणेकर, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, समीर सावंत, ज्येष्ठ संचालक व्हिक्टर डांटस, बाबा परब यांच्यासह अधिकारी, पिग्मी एजंट, दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थी, संस्था सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्ष दळवी पुढे म्हणाले, ‘‘आपली जिल्हा बँक राज्यात अग्रेसर आहे. तिची घौडदौड कायम ठेवण्यासाठी आमचा एक प्रामाणिक प्रयत्न चालला आहे. या सगळ्या प्रयत्नामध्ये आपण सगळ्यांनी, जिल्हावासीयांनी साथ द्यावी, अशा प्रकारचे एक आव्हान मी या निमित्ताने करतो. तसेच आपण आतापर्यंत टाकलेल्या विश्वास निश्चितपणे यापुढच्या काळामध्येही चांगल्या प्रकारे सार्थकी लावू अशा प्रकारचे ग्वाही मी या निमित्ताने देतो. याचप्रमाणे वंचित आणि खावटी कर्ज माफी मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.’’ ज्येष्ठ संचालक डांटस यांनी, जिल्हा बँकेच्या यशस्वीतेचे सिंधुदुर्गवासीयांना श्रेय जाते. दळवी यांनी अध्यक्ष झाल्यानंतर खूप नवीन योजना आणल्या आहेत. सुविधा निर्माण केल्या आहेत. संचालक मंडळाच्या सहकार्याने ही बँक पुढे जात आहे, असे सांगत असेच सहकार्य यापुढे बँकेच्या सर्व घटकांनी करावे, असे आवाहन केले.
---------
चौकट
८२.५० टक्के शेत कर्जाची वसुली
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी, बँकेचा आज ४१ वा वर्धापनदिन आहे. बँकेच्या विकासात सर्वांचाच मोठा सहभाग आहे. जिल्हा बँकेने यावर्षी ३५०० कोटी रुपये निधी ठेवींचा निर्धार केला आहे. आतापर्यंत २१०० कोटी ठेवी पूर्ण झाल्या आहेत. तसेच ३० जून शेतीकर्ज वसुलीचे वर्ष म्हटले जाते. गतवर्षी शेती कर्जाची ८० टक्के वसुली झाली होती. यावर्षी ८२.५० टक्के वसुली झाली आहे. म्हणजेच यातही वाढ केली आहे, असे सांगितले.
94050

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Close : आज शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारला तर निफ्टी २५८ अंकांनी वर, कोणते शेअर्स फायद्यात? पाहा

अरे तो वाघ आहे...! विदर्भात लोकांचा मुर्खपणा, मोबाईल कॅमेरा घेऊन जंगलच्या राजाचा पाठलाग, VIDEO VIRAL

Mpsc Success Story: बेस्ट वाहकाचा मुलगा बनला पाेलिस उपनिरीक्षक, सूरज गोळेची प्रतिकूल परिस्थितीवर करत यशाला गवसणी; आई राबतेय शेतात!

Latest Marathi Update : कांदिवलीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी मोठी गर्दी

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात मुक्त शिक्षण व्यवस्था राबवणार, शिक्षण विभागाचा नवा प्लॅन, नेमकी योजना काय?

SCROLL FOR NEXT