अरे तो वाघ आहे...! विदर्भात लोकांचा मुर्खपणा, मोबाईल कॅमेरा घेऊन जंगलच्या राजाचा पाठलाग, VIDEO VIRAL

Tourists Chase Tiger in Tadoba: ताडोबाच्या बफर झोनमध्ये पर्यटकांकडून हुल्लडबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. रस्ता ओलांडणाऱ्या वाघाचा पाठलाग करत व्हिडीओ शूट केल्याचं समोर आलंय.
Tourists Chase Tiger in Tadoba

Viral Video Shows Reckless Tourist Behavior

Esakal

Updated on

Viral Video: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघच सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. सोशल मीडियावर ताडोबातील बफर झोनमध्ये पर्यटकांकडून वाघाला घेरण्यात आल्याची घटना घडलीय. याचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात रस्त्यावर नागरिकांनीच वाघाला घेरल्याचं दिसून येत आहे. पर्यटक चक्क वाहनामधून खाली उतरून वाघाचं शूटिंग करत असल्याचंही या व्हिडीओमद्ये दिसत आहे. सुदैवाने वाघाने कोणावर हल्ला केला नाही? मात्र माणसांनी वाघाच्या हद्दीतच त्याचा पाठलाग करत त्रास दिल्याच्या प्रकाराने वन्यजीव प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. Tourists Chase Tiger for Video in Tadoba Buffer Zone

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com