आचरा ग्रामपंचायतीमार्फत
कृषिदिनानिमित्त वृक्षारोपण
आचरा, ता. २ ः आचरा ग्रामपंचायतीतर्फे कृषिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, पत्रकार अर्जुन बापर्डेकर, लोकमान्य सोसायटीचे मोर्वेकर, श्री. मिराशी, ग्रामपंचायत सदस्य श्रृती सावंत, पोलिसपाटील विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी, ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब, गिरीश आपकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन साजरा केला जातो. आचरा ग्रामपंचायतीतर्फे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस सरपंच फर्नांडिस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
94071
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.