कोकण

पणदूर महाविद्यालयात मार्गदर्शन वर्गास प्रतिसाद

CD

पणदूर महाविद्यालयामध्ये
मार्गदर्शन वर्गास प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या ‘प्लेसमेंट आणि करिअर कट्टा’ या विभागाद्वारे २७ ते २९ जून या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विविध करिअर्सच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, मुलाखत तयारी तसेच नवीन शैक्षणिक धोरण या विषयी मार्गदर्शनाचे आयोजन केले होते.
बेळगाव येथील सॉफ्टमस्क प्रा. लि. कंपनीचे सीईओ राजशेखर पाटील, अमोल कानगोपकर, अमृत साईनाथकर, राज कल्याणकर, नागराज घाडी यांनी ‘आयटी’ विषयातील वेगवेगळ्या भाषांविषयी माहिती दिली. तसेच आयटी क्षेत्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध संधी व विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी मुलाखतीला सामोरे कसे जावे याविषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा सुमारे ५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. अविनाश वालावलकर यांनी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले. स्वतःचा विकास घडवायचा असेल तर प्रत्येकाजवळ वेळेचे नियोजन असणे अत्यंत जरुरीचे असल्याचे प्रतिपादन करत वेळ ही अमूल्य गोष्ट आहे, तिचा जपून वापर करा असा संदेशही श्री. वालावलकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रा. डी. व्ही. गावडे यांनी नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार अभ्यासक्रमात झालेले विविध बदल याविषयी माहिती दिली. यावेळी ‘प्लेसमेंट आणि करिअरकट्टा’च्या विभाग प्रमुख प्रा.उमा सावंत, सदस्य प्रा. डी. व्ही. गावडे, प्रा. प्रथमेश गोसावी, प्रा. स्मिता परब आदी उपस्थित होते. कु. नारायण पावसकर याने सूत्रसंचालन केले. कु. वैष्णवी नारकर हिने आभार मानले.
94243

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Tukaram Mundhe:तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश तुमची कशी होतेय लूट?

SCROLL FOR NEXT