कोकण

सावंतवाडीत डास निर्मूलन मोहीम राबवा ः प्रांताधिकारी

CD

सावंतवाडीत डास निर्मूलन
मोहीम राबवा ः प्रांताधिकारी

‘युवा रक्तदाता’ने वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः शहरवासीयांच्या आरोग्याशिवाय इतर काहीही महत्त्वाचे नाही. डास निर्मूलनासाठी आवश्यक मशिनरी आठ दिवसांत खरेदी करा, असे आदेश प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्यासह युवकांनी प्रांत श्री. निकम यांची भेट घेत डासांचा वाढता उपद्रव व प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईबाबत लक्ष वेधले.
यावेळी निकम यांनी तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले.
शहरात वाढलेल्या डासांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत लक्ष वेधूनही योग्य कार्यवाही होत नसल्याने सूर्याजी यांनी मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात एक हजार मच्छर अगरबत्त्या लावणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर तत्काळ प्रतिबंधात्मक औषध फवारणीची मोहीम पालिका प्रशासनाने हाती घेतली; मात्र त्यानंतरही डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने आज युवा रक्तदाता संघटनेने प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी निकम यांची भेट घेत डासांच्या उपद्रवाबद्दल लक्ष वेधले. वाढत्या डासांमुळे डेंगी, मलेरियाची साथ पाहता तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी सूर्याजी यांनी केली. यावेळी अर्चित पोकळे, राघवेंद्र चितारी, सूरज मठकर, प्रथमेश प्रभू, अभी गवस, दिग्विजय मुरगोड, वसंत सावंत आदी उपस्थित होते.
---
रोगराई वाढणे योग्य नव्हे!
प्रांताधिकारी निकम यांनी मुख्याधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले. शहरात रोगराई वाढणे योग्य नाही. दिवसेंदिवस शहराचा आवाका वाढत आहे. अशावेळी दोन ऐवजी चार मशिनरी खरेदी करा, आठ दिवसांत डास निर्मूलन मोहीम हाती घ्या, प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करा, अशा सूचना मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिल्या.
94263

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Mumbai Family Death Mystery : कलिंगडात विष नव्हतं, मग मृत्यू कसा झाला? मुंबईतील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, FDA चा धक्कादायक अहवाल समोर

HSC Result: बारावीनंतर नोकरी करायची आहे ? रेल्वेमध्ये करा उत्तम करिअर, टीटीई होण्यासाठी अशी करा तयारी

Mumbai Crime: १,७४५ कोटी रुपयांचे कोकेन महामुंबईत जप्त, एनसीबीची सर्वात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT