

Maharashtra HSC Result 2026
esakal
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेली बारावीची परीक्षा १४ लाख ३३ हजार ५७ विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील १२ लाख ८६ हजार ८४३ म्हणजेच तब्बल ८९.७९ टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, गेल्यावर्षीच्या (२०२५) तुलनेत यंदा निकालात २.०९ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे.